T20 World Cup 2024 Super 8 Weather Forecast Update sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

T20 World Cup 2024 Super 8 Weather Forecast Update : आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये साखळी सामने जवळपास संपले आहेत. 19 जूनपासून सुपर-8 चे सामने सुरू होणार आहेत.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Super 8 Team India Schedule Weather Forecast: आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये साखळी सामने जवळपास संपले आहेत. 19 जूनपासून सुपर-8 चे सामने सुरू होणार आहेत. पावसामुळे अनेक साखळी सामनेही रद्द झाल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे अनेक संघांच्या अडचणीही वाढल्या होत्या. पण आता सुपर-8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जाणार आहे. परंतु एका अहवालानुसार या सर्व सामन्यांवरही पावसाची सावली आहे.

सुपर-8 गटावर नजर टाकली तर पाऊस सोडला तर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यात फारशी अडचण येणार नाही. टीम इंडियासाठी फक्त ऑस्ट्रेलिया हे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते. अफगाणिस्तान आणि बांगलादेशही या गटात आहेत, पण या दोन संघांविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला आहे.

सुपर-8 मध्ये एकूण 8 संघ असतील, ज्यांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

  • अ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश

  • ब गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका

4 ठिकाणी होणार एकूण 12 सामने

वेस्ट इंडिज, बार्बाडोस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि अँटिग्वा या चार ठिकाणी सुपर-8मध्ये एकूण 12 सामने खेळवले जाणार आहेत. यूके मेट डिपार्टमेंट आणि वेदर चॅनलच्या रिपोर्टनुसार, या सर्व सामन्यांदरम्यान पावसाचा धोका आहे.

बार्बाडोस, केन्सिंग्टन ओव्हलवरील कोणत्या सामन्यात पावसाची शक्यता किती?

20 जून - भारत विरुद्ध अफगाणिस्तान - 10-20 टक्के

22 जून - वेस्ट इंडिज विरुद्ध अमेरिका - 40 टक्के

23 जून - यूएसए विरुद्ध इंग्लंड - 54 टक्के

29 जून अंतिम – 53 टक्के

सेंट लुसियातील कोणत्या सामन्यात पावसाची शक्यता किती?

20 जून - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड - 20 टक्के

21 जून - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 20 टक्के

24 जून – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 50 टक्के

अँटिग्वामधील कोणत्या सामन्यात पावसाची शक्यता किती?

19 जून - अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 23 टक्के

21 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – 25 टक्के

22 जून - भारत विरुद्ध बांगलादेश - 20 टक्के

24 जून - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 25 टक्के

सेंट व्हिसेंटमधील कोणत्या सामन्यात पावसाची शक्यता किती?

23 जून - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 52 टक्के

25 जून - अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश - 47 टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT