USA | Pakistan  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: अमेरिका की पाकिस्तान? पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोण जाणार सुपर-8 मध्ये; जाणून घ्या समीकरण

USA vs Ireland: टी20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मधून भारतीय संघाने आधीच सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवला आहे, आता दुसऱ्या क्रमांकासाठी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात काट्याची टक्कर आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, USA Qualification Scenario: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत शुक्रवारी अमेरिका आणि आयर्लंड संघात सामना होणार आहे. फ्लोरिडाला होणारा हा सामना अमेरिकेचा या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा अखेरचा सामना आहे. त्यामुळे हा सामना यजमान अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. हा ग्रुप ए मधील सामना आहे.

ग्रुप ए मधून भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकून सुपर-8 फेरीत प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळे आता या ग्रुपमधून आणखी एक संघ सुपर-8 फेरीत जाणार आहे. पण त्यासाठी अद्यापही अमेरिका, पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड हे चारही संघ शर्यतीत आहेत.

तरी कॅनडा आणि आयर्लंड यांचे आव्हान केवळ गणितीय समीकरणानुसार जिवंत आहे. कारण त्यांचा नेट रन रेट अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यापेक्षा अत्यंत कमी आहे.

तसेच कॅनडाचे सध्या 3 सामन्यांपैकी एका विजयासह 2 गुण आहेत, तर आयर्लंडे पहिले दोनही सामने गमावल्याने त्यांचे शून्य गुण आहेत. मात्र, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या काट्याची टक्कर आहे.

सध्या ग्रुप ए मध्ये भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. त्यांनी तीन सामन्यांपैकी 2 सामने जिंकले असल्याने त्यांचे 4 गुण आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानने 3 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला आहे.

त्याचमुळे जर अमेरिकेने आयर्लंडविरुद्ध होणाऱ्य़ा सामन्यांत विजय मिळवला, तर अमेरिका थेट सुपर-8 फेरीत पोहचेल. यामुळे पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड या तिन्ही संघांचे आव्हान संपेल.

त्याचबरोबर सध्या फ्लोरिडामध्ये पावसाचे वातावरणही आहे. त्याचमुळे जर अमेरिका आणि आयर्लंड सामना पावसामुळे रद्द जरी झाला, तरी दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळणार असल्याने अमेरिकाच पुढच्या फेरीत आगेकुच करेल आणि अन्य तिन्ही संघ स्पर्धेतून बाहेर होतील.

त्याचमुळे आता पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा या तिन्ही संघांना आशा असेल की अमेरिकेचा पराभव व्हावा. असे झाल्यास अन्य सर्व संघांना सुपर-8 फेरीत जाण्यासाठी दावेदारी ठोकता येऊ शकते, पण त्यासाठी अन्य तिन्ही संघांना त्यांच्या उर्वरित सामन्यांत विजय आवश्यकच आहे.

पाकिस्तानसाठी जमेची बाजू ही आहे की त्यांचा नेट रन रेट हा अमेरिकेपेक्षा चांगला आहे. त्यामुळे जर अमेरिकेला आयर्लंडने शुक्रवारी पराभूत केले, तर पाकिस्तानच्या सुपर-8 मध्ये जाण्याचा आशा उंचावणार आहेत. जर अमेरिकेचा पराभव झाला, तर पाकिस्तानला सुपर-8 फेरीसाठी 16 जूनला आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यांत विजय मिळवावाच लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Blanket: ट्रेनमधील घाणेरड्या चादरींची समस्या दूर झाली! आता गाड्यांमध्ये दिसणार सांगानेरी प्रिंट असलेले ब्लँकेट, खासियत काय?

Nilesh Ghaywal passport case : निलेश घायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या एजंटची चौकशी होणार; सध्या कारागृहात भोगतोय शिक्षा

Mumbai Local: मुंबई लोकल रोजच विलंबाने, प्रवाशांना मनस्ताप; आंदोलनाचे शस्त्र उगारणार

Pension Hike: राज्य सरकारची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये वाढ, आता किती रुपये मिळणार?

Latest Marathi News Live Update: मीरा-भाईंदरमध्ये डम्पिंग ग्राऊंडला आग

SCROLL FOR NEXT