T20 World Cup 2024 Wasim Akram criticises Pakistan sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : "बाबर आझमची पाकिस्तान टीम...", अमेरिकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर संतापले दिग्गज

Pakistan T20 World Cup 2024 : अमेरिकेने पहिल्या काही षटकांमध्ये विकेट घेऊन पाकिस्तानचा पाय खोलात नेला.

Kiran Mahanavar

अमेरिकन क्रिकेट संघाकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेलेल्या पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर महान कर्णधार व गोलंदाज वासीम अक्रम यांनी कडाडून टीका केली. जय-पराजय हा खेळाचा एक भाग असतो. मात्र अखेरच्या चेंडूपर्यंत लढत राहायला हवे. बाबरच्या पाकिस्तानी संघाकडून लज्जास्पद कामगिरी झाली. त्यांच्याकडून झुंज देण्याचा प्रयत्नच करण्यात आला नाही.

वासीम अक्रम यांनी पाकिस्तानी खेळाडूंची कानउघाडणी करताना म्हटले की, अमेरिकेने पहिल्या काही षटकांमध्ये विकेट घेऊन पाकिस्तानचा पाय खोलात नेला. लढतीला कलाटणी येथेच मिळाली. बाबर आझम व शादाब खान यांनी थोडीफार भागीदारी केली, पण पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. एकूणच काय तर सर्वच बाबींमध्ये पाक संघाकडून निराशा झाली. त्यांच्याकडून साधारण कामगिरी करण्यात आली.

अमेरिकन संघाचे कौतुक

वासीम अक्रम यांनी अमेरिकन संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. या वेळी ते म्हणाले, अमेरिकन संघाविरुद्धच्या लढतीत पाक संघ आरामात विजयी होईल असे वाटत होते. पाठीराख्यांनाही विजयाचा विश्‍वास होता. पाक संघाने प्रथम फलंदाजी केल्यानंतरही हा विश्‍वास कायम राहिला, पण अमेरिकन संघाने धावांचा यशस्वी पाठलाग केला. कर्णधार मोनांक पटेल याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अमेरिकन संघाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. वेल डन अमेरिका...

पाक संघाचा मार्ग खडतर

अमेरिकन संघाविरुद्धच्या लढतीत झालेल्या पराभवानंतर आता पाकिस्तानी संघाचा पुढील फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर असणार आहे, असे वासीम अक्रम यांना वाटते. ते म्हणतात की, आता पाकिस्तानी संघासमोर बलाढ्य भारताचे आव्हान असणार आहे. त्यानंतर आयर्लंड व कॅनडा या संघांचा त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पाकसाठी प्रत्येक लढत अटीतटीची असेल असेच म्हणावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

Pune News : खडीमशीन ते हांडेवाडी रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; भरधाव मिक्सर, टँकर्समुळे नागरिकांचा जीव धोक्यात

Virar News : ११ वर्षीय मुलीच्या थायरॉईडमध्ये अडकलेला मासळीचा काटा डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे काढला

SCROLL FOR NEXT