T20 World Cup Schedule Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

T20 World Cup Schedule: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

T20 World Cup 2024 Schedule: देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचलेली असतानाच अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे नगारे भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी सहा वाजता वाजणार आहेत आणि पुन्हा एकदा भारतीय संघाबाबतच्या आशा फेर धरणार आहेत.

तब्बल २० देश, २९ दिवस, ५५ लढती अशी मोठी मेजवानी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. सर्वप्रथम प्रत्येकी पाच संघ असलेले चार गट त्यांच्यात होणारे साखळी सामने त्यानंतर अव्वल आठ संघात ‘सुपर-८’ असे स्पर्धेचे स्वरूप आहे. यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. सर्वांना प्रतीक्षा असलेली भारत-पाकिस्तान सामना नऊ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी मायदेशात भारतीय संघाचे हातातोंडाशी आलेले एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते. आता तरी ‘आयसीसी’चा विश्वकरंडक उंचावणार का याची उत्सुकता आहे. २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर भारताला प्रत्येकवेळी हुलकावणी मिळालेली आहे.

टी२० वर्ल्ड कप २०२४ दृष्टिक्षेपात

  • २० संघ, २९ दिवस स्पर्धा आणि ५५ लढती

  • वेस्ट इंडीजमध्ये दुसऱ्यांदा, तर अमेरिकेत पहिल्यांदा ‘टी-२०’ विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येत आहे. याआधी २०१० मध्ये वेस्ट इंडीजमध्ये ‘टी-२०’ विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते.

  • दोन जून रोजी या स्पर्धेचा श्रीगणेशा होईल, तर २९ जून रोजी स्पर्धेचा जेता ठरणार आहे.

  • पाच गटांमध्ये देशांची विभागणी, प्रत्येक गटात पाच देशांचा समावेश.

  • साखळीतील प्रत्येक गटातील सर्वोत्तम दोन संघ ‘सुपर-८’ फेरीसाठी पात्र.

  • ‘सुपर-८’ फेरीत आठ संघांची दोन गटांत विभागणी

  • ‘सुपर-८’फेरीमधील प्रत्येक गटातील अव्वल दोन देश उपांत्य फेरीसाठी पात्र.

  • २७ जूनला उपांत्य फेरीच्या लढती, २९ जूनला अंतिम लढतीची रंगत.

टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे वेळापत्रक (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

  • २ जून:

    • अमेरिका वि. कॅनडा (डल्लास) सकाळी ६

    • वेस्ट इंडीज वि. पापूआ न्यू गिनी (प्रोव्हिडन्स) रात्री ८

  • ३ जून

    • नामिबिया वि. ओमन (ब्रिजटाऊन) सकाळी ६

    • श्रीलंका वि. द. आफ्रिका (न्यूयॉर्क) रात्री ८

  • ४ जून

    • अफगाणिस्तान वि. युगांडा (गयाना) सकाळी ६

    • इंग्लंड वि. स्कॉटलंड (बार्बाडोस) रात्री ८

    • नेदरलँडस वि. नेपाळ (डल्लास) रात्री ९

  • ५ जून

    • भारत वि. आयर्लंड (न्यूयॉर्क) रात्री ८

  • ६ जून

    • पापूआ न्यू गिनी वि. युगांडा (गयाना) सकाळी ५

    • ऑस्ट्रेलिया वि. ओमन (बार्बाडोस) सकाळी ६

    • अमेरिका वि. पाकिस्तान (डल्लास) रात्री ९

  • ७ जून

    • नामिबिया वि. स्कॉटलंड (बार्बाडोस) मध्यरात्री १२.३०

    • कॅनडा वि. आयर्लंड (न्यूयॉर्क) रात्री ८

  • ८ जून

    • अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड (गयाना) सकाळी ५

    • बांगलादेश वि. श्रीलंका (डल्लास) सकाळी ६

    • नेदरलँडस वि. दक्षिण आफ्रिका (न्यूयॉर्क) रात्री ८

    • ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड (ब्रिजटाऊन) रात्री १०.३०

  • ९ जून

    • वेस्ट इंडीज वि. युगांडा (गयाना) सकाळी ६

    • भारत वि. पाकिस्तान (न्यूयॉर्क) रात्री ८

    • ओमन वि. स्कॉटलंड (अँटिग्वा ) रात्री १०.३०

  • १० जून

    • बांगलादेश वि. द. आफ्रिका (न्यूयॉर्क) रात्री ८

  • ११ जून

    • कॅनडा वि. पाकिस्तान (न्यूयॉर्क) रात्री ८

  • १२ जून

    • नेपाळ वि. श्रीलंका (लॉडरहील) पहाटे ५

    • ऑस्ट्रेलिया वि. नामिबिया (अँटिग्वा) सकाळी ६

    • भारत वि. अमेरिका (न्यूयॉर्क) रात्री ८

  • १३ जून

    • वेस्ट इंडीज वि. न्यूझीलंड (तारौबा) सकाळी ६

    • बांगलादेश वि. नेदरलँडस (किंगस्टन) रात्री ८

  • १४ जून

    • इंग्लंड वि. ओमान (नॉर्थ साऊंड) मध्यरात्री १२.३०

    • अफगाणिस्तान वि. पापूआ न्यू गिनी (तारौबा) स. ६

    • अमेरिका वि. आयर्लंड (लॉडरहील) रात्री ८

  • १५ जून

    • नेपाळ वि. द. आफिका (किंगस्टन) पहाटे ५

    • न्यूझीलंड वि. युगांडा (तारौबा) सकाळी ६

    • भारत वि. कॅनडा (लॉडरहील) रात्री ८

    • इंग्लंड वि. नामिबिया (नॉर्थ साऊंड) रात्री १०.३०

  • १६ जून

    • ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलंड (ग्रॉसलेट) सकाळी ६

    • आयर्लंड वि. पाकिस्तान (लॉडरहील) रात्री ८

  • १७ जून

    • बांगलादेश वि. नेपाळ (किंगस्टन) सकाळी ५

    • नेदरलँडस वि. श्रीलंका (सेंट विन्सेंट) सकाळी ६

    • न्यूझीलंड वि. पापूआ न्यू गिनी (तारौबा) रात्री ८

  • १८ जून

    • वेस्ट इंडीज वि. अफगाणिस्तान (सेंट लुसिया) रात्री ८

  • सुपर ८

  • १९ जून :

    • अ २ वि. ड १ (अँटिग्वा) रात्री ८

  • २० जून :

    • ब १ वि. क २ (सेंट लुसिया) सकाळी ६

    • क १ वि. अ १ (ब्रिजटाऊन) रात्री ८

  • २१ जून :

    • ब २ वि. ड २ (अँटिग्वा) सकाळी ६

    • ब १ वि. ड १ (ग्रॉसलेट) रात्री ८

  • २२ जून :

    • अ २ वि. क २ (ब्रिजटाऊन) सकाळी ६

    • अ १ वि. ड २ (सेंट लुसिया ) रात्री ८

  • २३ जून :

    • क १ वि. ब २ (किंगस्टन) सकाळी ६

    • अ १ वि. ब १ (ब्रिजटाऊन) रात्री ८

  • २४ जून :

    • क २ वि. ड १ (अँटिग्वा) सकाळी ६

    • ब २ वि. अ १ (ग्रॉसलेट) रात्री ८

  • २५ जून :

    • क १ वि. ड २ (किंगस्टन) सकाळी ८

  • २७ जून :

    • पहिली उपांत्य फेरी - (तारौबा) सकाळी ६

    • दुसरी उपांत्य फेरी - (गयाना) रात्री ८

  • २९ जून - अंतिम सामना (बार्बाडोस) रात्री ८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT