T20 World Cup Semi - Final | India vs England Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: भारत-इंग्लड सेमीफायनलसाठी का नाही राखीव दिवस? जाणून घ्या कारण

T20 World Cup 2024, India vs England: आयसीसीने पहिल्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे, मात्र भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही, यामागील कारण जाणून घ्या.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 India vs England: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळवला जाणार आहे. हा सामना गयानामधील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी (27 जून) रात्री 8 वाजता चालू होणार आहे.

त्याआधी दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात उपांत्य फेरीतील पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी पहाटे 6 वाजता तौरोबाला खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे.

मात्र भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवलेला नाही. यामागे वेळ आणि प्रवास हे मुख्य कारण आहे.

भारत - इंग्लंड सामन्याला राखीव दिवस का नाही?

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी पहाटे 6 वाजता होणार आहे, पण त्यावेळी तौरोबाला बुधवारचे रात्रीचे 8.30 वाजलेले असतील.

तसेच भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी रात्री 8 वाजता चालू होणार असला, तरी गयानाला त्यावेळी गुरुवारचे सकाळचे 10.30 वाजलेले असतील. तसेच शुक्रवारी (28 जून) अंतिम सामन्यात पोहचणाऱ्या संघांसाठी प्रवासाचा दिवस असणार आहे. कारण 29 जूनला बार्बाडोसला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या, तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना जरी स्थानिकवेळेनुसार बुधवारी पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तरी गुरुवारी राखीव दिवशी पूर्ण होऊ शकतो. तसेच शुक्रवारी संघ प्रवासही करू शकतो.

तसेच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना गुरुवारी होणार आहे. तसेच शुक्रवारी प्रवासाचा दिवस असल्याने या सामन्यासाठी राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

राखीव दिवस नसला तरी...

दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस नसला, तरी त्यासाठी ज्यादाचे 250 मिनिटे देण्यात आली आहेत. म्हणजेच हा सामना पूर्ण करण्यासाठी पंचांकडे 8 तासांचा एकूण वेळ असणार आहे.

तसेच नियमानुसार जर उपांत्य सामना रद्द झाला, तर सुपर-8 फेरीत ग्रुपमध्ये अव्वल स्थान असलेला संघ अंतिम सामन्यात पोहचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT