David Warner Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC : TikTok हिरोची टकाटक फिफ्टी!

त्याच्या भात्यातून निघलेल्या धावा ऑस्ट्रेलियन संघासाठी फायदेशीरच ठरतील.

सुशांत जाधव

आयपीएल स्पर्धेत वॉर्नरने पहिल्यांदा कॅप्टन्सी गमावली आणि प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थानही गमावल्याचे पाहायला मिळाले.

Australia vs West Indies second half-century in the tournament for David Warner : वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात डेविड वॉर्नरने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले. TkTok च्या प्लॅटफॉर्मवर बॉलिवूड आणि तमिळ गाण्यावर तगडा फॉर्म दाखवलेला वार्नर गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानातील त्याची कामगिरी चांगलीच खालावली होती. आयपीएल स्पर्धेत वॉर्नरने पहिल्यांदा कॅप्टन्सी गमावली आणि प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थानही गमावल्याचे पाहायला मिळाले.

फ्रेंचायझी क्रिकेटमधील त्याचा ही कामगिरी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरणार का? त्याल ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान तरी मिळणार का? अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्याने आपल्या भात्यात अजूनही फटकेबाजी कायम असल्याचे दाखवून दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत वॉर्नरने 14 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेविरुद्ध तो पुन्हा आपल्या तोऱ्यात खेळताना दिसले. या सामन्यात त्याने दुबईच्या मैदानात यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. 42 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने त्याने 65 धावांची खेळी साकारली होती.

इंग्लंड विरुद्ध त्याला अवघी एकच धाव करता आली. बांगलादेश विरुद्धही त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो अवघ्या 18 धावा करु शकला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील वॉर्नरचे हे 20 वे अर्धशतक आहे. त्याने 86 सामन्यात 32 च्या सरासरीने 2400 हून अधिक धावा केल्या आहेत. महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याच्या भात्यातून निघलेल्या धावा ऑस्ट्रेलियन संघासाठी फायदेशीरच ठरतील.

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाची कामगिरी ही दमदार राहिली आहे. इंग्लंड विरुद्धचा एकमेव सामना त्यांनी गमावला आहे. त्याच्याशिवाय अन्य सामन्यात त्यांनी बाजी मारत सेमीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. वेस्ट इंडीज विरुद्धचा सामना जिंकताच त्यांच्या खात्यात 8 गुण जमा होतील. या सामन्यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात या ग्रुपमधील आणखी एक सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर पहिल्या गटातील सेमी फायनलचे दोन संघ पक्के होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साप्ताहिक राशिभविष्य : २८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६

New Marathi Book Releases 2025 : साहित्याची नवी मेजवानी; कुस्तीच्या लाल मातीपासून ते करिअरच्या यशोगाथेपर्यंत, वाचा ५ खास पुस्तके!

Marathi Literature Fiction : "निसर्ग काही भव्य रचण्यात वा मोडण्यात मग्न आहे..." मानवी अस्तित्वाचा वेध घेणारा एक अस्वस्थ संवाद

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

SCROLL FOR NEXT