Chris Gayle and Dwayne Bravo Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

चॅम्पियन ब्रावोसह युनिव्हर्सल बॉसचाही अखेरचा सामना?

संघातील खेळाडूंनी गेलला 'स्टँडींग ओवेशन' दिल्याचे पाहायला मिळाले.

सुशांत जाधव

T20 World Cup 2021 अबूधाबी येथील शेख झायद क्रिकेट स्टेडियमवरील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना कॅरेबियन ताफ्यातील दोन दिग्गजांसाठी खास आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस गेलच्या (Chris Gayle) रुपात वेस्ट इंडीजला पहिला धक्का बसला. बाद होऊन डग आउटमध्ये परतत असताना संघातील खेळाडूंनी गेलला 'स्टँडींग ओवेशन' दिल्याचे पाहायला मिळाले. गेलने अद्याप अधिकृतरित्या निवृत्तीची घोषणा केलेली नाही.

गेल बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने संघातील खेळाडूंनी त्याला सन्मान दिला त्यावरुन हा सामना ब्रावोसह ख्रिस गेलसाठीही अखेरचा असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीये. फलंदाजीवेळी जी गोष्ट घडली त्याउलट चित्र वेस्ट इंडीजचा संघ गोलंदाजी करताना मैदानात उतरताना पाहायला मिळाले. ब्रावोला स्टँडींग ओवेशन देताना गेल आपल्या सहकाऱ्यांसोबत उभा दिसला. त्यामुळे अजूनही आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी तो तयार असल्याचे दिसते.

ड्वेन ब्रावोने ब्रावो (Dwayne Bravo) यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार, असे त्याने स्पष्ट केले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ब्रावो इतर सामन्याच्या तुलनेत लवकर खेळायला आला. अखेरच्या सामन्यात अविस्मरणीय खेळी करण्यात मात्र त्याला अपयश आले. हेजलवूडच्या गोलंदाजीवर वॉर्नरने त्याला झेलबाद केले. त्याने अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 12 चेंडूत 10 धावांची खेळी केली. यात एका षटकाराचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही तो फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकते. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा ब्रावो आगामी मेगा लिलावानंतर खेळणार का? तो पुन्हा धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईमध्ये दिसणार की अन्य कोणत्या संघात सहभागी होणार या प्रश्नाची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT