England vs Australia  T20 Word Cup Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC बटलरची तुफानी खेळी; इंग्लंडनं उडवला कांगारुंचा धुव्वा

माफक धावांचा पाठलाग करताना जोस बटलर आणि जेसन रॉय जोडीनं इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर 12 गटातील पहिल्या गटात इंग्लंडने आपली बादशाहत कायम ठेवलीये. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात सलग तिसरा विजय नोंदवत इंग्लंडचा संघ पहिल्या गटात अव्वल ठरलाय. इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत इंग्लंड गोलंदाजांनी तगड्या ऑस्ट्रेलियाला अवघ्या 125 धावांत रोखले होते.

माफक धावांचा पाठलाग करताना जोस बटलर आणि जेसन रॉय जोडीनं इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकात 66 धावा केल्या. झम्पाने जेसन रॉयच्या रुपात ऑस्ट्रेलियाकडून पहिली विकेट घेतली. त्याची जागा घेण्यासाठी आलेला डेविड मलान अवघ्या 8 धावंची भर घालून माघारी परतला. एका बाजूनं या दोन विकेट्स पडल्या असताना दुसऱ्या बाजूनं बटलरची फटकेबाजी सुरुच होती. त्याने 32 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 71 धावा कुटल्या. जॉनी बेयरस्टोनं 2 षटकार खेचून 11 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. या जोडीनं 8 विकेट्स राखून संघाला विजयी मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

Latest Marathi News Live Update: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एक कोटींची फसवणूक

KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

"दोनशे लोकांचं जेवण आणि घाईघाईत बुकिंग", 'सीजेपी'च्या व्हायरल व्हिडीओवर हॉटेल व्यवस्थापनाची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT