ICC WC 2021 Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

T 20 WC : फायनलसाठी UAE सरकारनं राखली BCCI ची मर्जी

बीसीसीआय आणि अमीरात क्रिकेट बोर्डाने संयुक्तपणे एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल लढतीतून दोन संघ फायनल खेळताना दिसतील. दुबईच्या मैदानात रंगणाऱ्या फायनल सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय आणि अमीरात क्रिकेट बोर्डाने संयुक्तपणे एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. प्रेक्षकांची मर्यादा हटवण्यात आली असून फायनल लढतीवेळी स्टेडियमच्या 100 क्षमतेनुसार क्रिकेट चाहत्यांना प्रवेश दिला जाईल.

एएनआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि ईसीबी संपुर्ण क्षमतेने मैदानात प्रेक्षकांना परवानगी देण्यासंदर्भात उत्सुक होते. यासाठी त्यांना UAE सरकारने परवानगी देखील दिली आहे. स्टेडियम हाउस फुल होणार असले तरी यावेळी चाहत्यांना कोरोना प्रोटोकॉलच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे.

आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत केवळ स्टेडियमच्या क्षमतेच्या 70 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जात होता. फायनलचा सामन्यासाठी यूएई सरकारच्या अधिकाऱ्यांनी 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. भारतीय संघ बाहेर पडला असला तरी यजमान पद भारताकडे असल्यामुळे स्पर्धेची सांगता दिमाखदार करण्यास बीसीसीआय उत्सुक असेल. युएई सरकारच्या निर्णयामुळे हा मार्ग सुकर होईल.

सुपर 12 च्या पहिल्या गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी सेमी फायनलचे तिकीट मिळवले आहे. दुसऱ्या गटात पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांनी सेमी फायनल गाठलीये. पहिल्या गटात अव्वलस्थानी असलेला इंग्लंड आणि दुसऱ्या गटातून पात्र ठरलेला न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमी फायनल सामना रंगणार आहे. बुधवारी 10 नोव्हेंबर रोजी हा सामना अबूधाबीच्या शेख झायद स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान आणि आस्ट्रेलिया यांच्यात दुसरी सेमी फायनल रंगेल. हा सामना गुरुवारी 11 नोव्हेंबरला दुबईच्या मैदानात नियोजित आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही त्यामुळे त्यांचे पारडे कुठेतरी जड वाटते. यातून फायनलमध्ये कोण धडक मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT