Jasprit Bumrah | Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: बुमराह ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू; पाहा आत्तापर्यंत मालिकावीर ठरलेल्या क्रिकेटर्सची संपूर्ण लिस्ट

T20 World Cup, Player of the Match: टी20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत मालिकावीर पुरस्कार जिंकलेल्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट जाणून घ्या

Pranali Kodre

T20 World Cup, Player of the Match: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (29 जून) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली.

या स्पर्धेतील मालिकावीर जसप्रीत बुमराह ठरला. बुमराहने या स्पर्धेत अनेकदा महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. अंतिम सामन्यातही त्याने दोन विकेट्स घेतल्या. या संपूर्ण स्पर्धेत त्याने 8 सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलं.

तो टी20 वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर ठरणारा आठवा खेळाडू ठरला, तर विराट कोहलीनंतरचा दुसराच भारतीय ठरला. विराटने 2014 आणि 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता. विशेष म्हणजे विराट टी20 वर्ल्ड कपमध्ये दोनदा मालिकावीर होणारा एकमेव खेळाडू आहे.

टी20 वर्ल्ड कपमधील मालिकावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू

  • 2007 - शाहिद आफ्रिदी

  • 2009 - तिलकरत्ने दिलशान

  • 2010 - केविन पीटरसन

  • 2012 - शेन वॉटसन

  • 2014 - विराट कोहली

  • 2016 - विराट कोहली

  • 2021 - मिचेल मार्श

  • 2022 - सॅम करन

  • 2024 - जसप्रीत बुमराह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT