Dhoni  Dhoni
क्रिकेट वर्ल्ड कप

Video Viral : धोनीचे ‘ते’ वक्तव्य पाच वर्षांनंतर ठरले खरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आजवर अनेक सामने खेळल्या गेलेत. यात दोन्ही संघांनी विजय मिळवण्यासह पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी आयसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या सामन्यात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता. कित्येक वर्षांपासून कायम असलेला रेकॉर्ड रविवारी दुबईत तुटला. यामुळे पाच वर्षांपूर्वी माजी कर्णधार व क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केलेले भाकीत खरे ठरले. आता त्‍याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रविवारी पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा भारताचा विश्वचषकात पराभव केला. भारताने दिलेले १५२ धावांचे आव्हान पाकिस्तानने दहा गडी राखून पूर्ण केले. या विजयासह पाकिस्तानने विश्वचषकातील भारताविरुद्धची पराभवाची मालिका मोडली आणि विजयाचा आनंद अनुभवला. १९९२ ते २०१९ पर्यंत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता.

पराभवानंतर खेळाडूंवर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना धोनीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ २०१६ मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकातील आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पत्रकार परिषदेत धोनीने विजयाबाबत वक्तव्य केले होते. ते वक्तव्य खरे ठरल्याचे यातून दिसत आहे.

‘पाकिस्तानविरुद्ध हा आमचा ११ वा विजय आहे. आम्ही पराभूत झालो नाही याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, भविष्यात कधीतरी नक्कीच पाकिस्तानकडून पराभूत होणार आहो. तो पुढच्या पाच वर्षांनी, दहा वर्षांनी, २० वर्षांनी किंवा ५० वर्षांनंतर होईल. नेहमी आम्हीच जिंकू असे कधीही होणार नाही.’ हे वक्तव्य केल्यानंतर पाच वर्षांनी भारत पराभूत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

SCROLL FOR NEXT