Kiran Navgire sold to Delhi Capitals for ₹75 lakh in WPL 2027 auction
esakal
Kiran Navgire WPL 2027 auction price and team : महिला प्रीमिअर लीग २०२७ च्या लिलावात महाराष्ट्राची क्रिकेटपटू किरण नवगिरे हिच्यावर दिल्ली कॅपिटल्सने मोठा विश्वास दाखवला आहे. सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या किरणला दिल्लीच्या संघाने ७५ लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले. तिच्यासाठी मुंबई इंडियन्सनेही जोरदार प्रयत्न केले, पण त्यांना माघार घ्यावी लागली. महिला प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी कोची येथे लिलाव सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यात बरेच आश्चर्यकारक प्रसंग पाहायला मिळाले.