India vs England Warm up Match  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

टीम इंडियाची परफेक्ट प्रॅक्टिस, इंग्लंडविरुद्ध दिमाखदार विजय

मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट घेत गोलंदाजीतील धार दाखवून दिली.

सुशांत जाधव

T20 World Cup India vs England Warm up Match : लोकेश राहुल आणि इशान किशन या सलामी जोडीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने सराव सामन्यात आपले दिमाखदार तेवर दाखवून दिले. इंग्लंड विरुद्धच्या सराव लढतीत 6 चेंडू आणि 7 गडी राखून विजय नोंदवत भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड स्पर्धेची तयारी पक्की झाली असल्याचे संकेत दिले. विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट घेत गोलंदाजीतील धार दाखवून दिली. बुमरा आणि राहुल चाहरने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. भारतीय संघाने इंग्लंडला निर्धारित 20 षटकात 5 बाद 188 धावांत रोखले होते.

धावांचा पाठलाग करताना इशान किशन आणि लोकेश राहुल या जोडीनं भारताच्या डावाला सुरुवात केली. राहुलने आयपीएलमधील आपल्या कामगिरीतील सातत्य आणखी उंचावत कमालीच्या स्ट्राइक रेटने धावा करुन रोहित सोबत भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले. त्याने 24 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. मार्क वूडने त्याला बाद केले. तोपर्यंत पहिल्या विकेटसाठी त्याने इशान किशनसोबत 82 धावांची भागादारी रचली.

तो माघारी फिरल्यानंतर बॅकअप सलामीवीर इशान किशनने 46 चेंडूत 70 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार खेचले. रिटायर हर्ट होऊन त्याला तंबूत परतावे लागले. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. त्याला केवळ 11 धावांवर माघारी परतावे लागले. लिविंगस्टोनने त्याला बाद केले. सुर्यकुमार यादव 8 धावा करुन बाद झाला.

हार्दिक पांड्या 12 तर रिषभ पंतने 14 चेंडूत 29 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंतने षटकार खेचून धोनी स्टाइलमध्ये संघाला विजय नोंदवून दिला. भारतीय संघ दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. बुधवारी दुपारच्या सत्रात रंगणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा खेळताना दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT