IND vs PAK
IND vs PAK Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK : आफ्रिदीच्या मनात अजूनही टीम इंडियाची 'दहशत'

सुशांत जाधव

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) पाकिस्तान संघावर अविश्वास दाखवला आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा पाकिस्तान संघावर भारी पडेल, असे आफ्रिदीला वाटते. मनस्थिर ठेवून उत्तम रनणितीने जो संघ खेळेल त्याला यश मिळेल, असे मत आफ्रिदीने व्यक्त केले आहे. याबाबतीत भारती संघ पुढे असेल, असेही तो म्हणाला आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे पाकिस्तान विरुद्धचे रेकॉर्ड भन्नाट आहे. भारतीय संघाने कोणत्याही वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला जिंकू दिलेले नाही. त्यामुळेच हाय होल्टेज सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

पाकिस्तानच्या स्थानिक वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात कोणता संघ भारी ठरेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी आफ्रिदीनं टीम इंडियाचे नाव घेतले. आफ्रिदी म्हणाला की, दोन्ही संघ अनुभवी आहेत. 10-15 वर्षांपासून दोन्ही संघ उत्तम कामगिरी करत आहेत. भारतीय संघावर बीसीसीआयने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. त्याचा त्यांना चांगला रिझल्ट मिळतोय, असे म्हणत पाकिस्तान बोर्डाला त्याने अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. ही मॅच मनापासून शांत डोक्याने खेळणारा संघ बाजी मारेल, असे सांगताना भारतीय संघ जिगरबाज असल्याचा उल्लेखही त्याने केलाय. आफ्रिदीच्या मनात अजूनही भारतीय संघाचा दहशत असल्याचेच या वक्तव्यातून दिसून येते.

भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी आफ्रिदीनं पाक संघाला दिला सल्ला

भारतीय संघाला पराभूत करुन वर्ल्ड कप स्पर्धेतील रेकॉर्डमध्ये सुधारणा करायची असेल, तर पाकिस्तान संघाला 100 टक्के क्षमतेनं खेळावे लागेल. दबावात पाकिस्तान संघाने मनापासून उत्तम खेळ दाखवला तर त्यांना विजय मिळू शकतो, असेही आफ्रिदी यावेळी म्हणाला.

वर्ल्ड कप कोणताही असो टीम इंडिया नंबर वन!

टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानकडून कधीच पराभूत झालेला नाही. 1992 मध्ये वनडे वर्ल्ड कपपासून भारतीय संघाने विजयाचा धडाका सुरु केला. अद्यापही ही विजयी घोडदौड सुरुच आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात 7 सामने खेळवले गेले. यातील सर्व सामने टीम इंडियानेच जिंकले. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 2007 पासून आतापर्यंत 5 वेळा हे दोन संघ समोरासमोर भिडले. यातही सर्व सामन्यात भारतीय संघानेच बाजी मारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT