New Zealand vs Scotland Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

NZ vs SCO : टीम इंडियाला जे जमलं नाही ते स्कॉटलंडनही करुन दाखवलं!

धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडने दीडशे धाव करुन दाखवत आपल्या फलंदाजीत क्षमता सिद्ध केली.

सुशांत जाधव

New Zealand vs Scotland : दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर स्कॉटलंडने न्यूझीलंडला तगडी फाइट दिली. मार्टिन गप्टीलच्या 93 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 172 धावा केल्या होत्या. बोल्ट, साउदी आणि सोधी यांच्या माऱ्यावर उत्तम फटकेबाजी करत स्कॉटलंडने 5 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावांपर्यंत मजल मारुन दाखवली.

न्यूझीलंडच्या संघाने अवघ्या 16 धावांनी विजय नोंदवत सेमी फायनलच्या दिशेनं आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध अवघ्या 110 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडने दीडशे धाव करुन दाखवत आपल्या फलंदाजीत क्षमता सिद्ध केली. स्कॉटलंडकडून मायकल लीसने 20 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 42 धावांची नाबाद खेळी केली.

स्कॉटलंडच्या संघाचा सुपर 12 मधील दुसऱ्या गटातील सलग तिसरा पराभव असून न्यूझीलंडने सलग दुसऱ्या विजयासह आपल्या खात्यात 4 गुण जमा केले आहेत. न्यूझीलंडने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. सलामीच्या सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला होता. टीम इंडियापाठोपाठ स्कॉटलंड विरुद्ध त्यांना विजय मिळाला असला तरी नेट रनरेटच्यामध्ये ते कुठेतरी कमी पडले. परिणामी अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या गटात दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानने 3 सामन्यातील 2 सामने जिंकले असून त्यांचे नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा उत्तम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT