Virat Kohli Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

पाक विरुद्धच्या लढतीपूर्वी विराट भडकला! नेमकं काय घडलं....

पाकिस्तानच्या संघात सामन्याला कलाटणी देणारे खेळाडू आहेत.

सुशांत जाधव

T20 World Cup, IND vs PAK : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तो एका प्रश्नावर चांगलाच भडकला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असल्याचे विराटने सांगितले. तो टीम इंडियाच्या तयारीसंदर्भात बोलत असताना त्याला कॅप्टन्सीच्या मुद्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर कोहलीने संताप व्यक्त केला.

वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा मोठा निर्णय विराट कोहलीने स्पर्धेपूर्वीच घेतला होता. यावर विराट कोहलीने स्पष्टीकरणही दिले आहे. मात्र कॅप्टन्सीचा मुद्दा त्याची पाठ सोडायला तयार नाही. पुन्हा एकदा त्याला याच मुद्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर कोहलीने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले. या मुद्यावर मी अगोदरच स्पष्टीकरण दिले आहे. जर तुम्हाला फिरुन फिरुन त्याच मुद्यावर यायचे असेल तर मी काहीच बोलू शकत नाही. सध्याच्या घडीला संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर लक्षकेंद्रीत करत आहे. आम्ही सर्वोत्तम खेळ करण्यासाठी उत्सुक आहोत. तुम्हाला जर काही गोष्टी खोदून काढयच्या असतील तर त्या इथ मिळणार नाहीत, अशा शब्दांत त्यांना आपली नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. त्यांच्या विरुद्धच्या सामन्यात आत्मविश्वासाने मैदानात उतरु. पाकिस्तानच्या संघात सामन्याला कलाटणी देणारे खेळाडू आहेत. आम्ही आमच्या प्लॅनवर फोकस करुन सर्वोत्तम खेळ दाखवून देण्यास उत्सुक आहोत, असेही विराटने यावेळी सांगितले.

वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही? जर तो गोलंदाजी करत नसेल तर त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान उचित नाही, अशा प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यावरही विराट कोहलीने भाष्य केले. हार्दिक पांड्या दिवसांदिवस तंदुरुस्त होत आहे. आगामी सामन्यात तो गोलंदाजी करतानाही पाहायला मिळेल, असे सांगत हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनचा भाग निश्चित असेल, असे संकेतही त्याने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT