NZ vs NAM Instagram
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : विल्यमसनचा कडक स्टेट ड्राइव्ह; बचावासाठी अंपायरची कसरत

न्यूझीलंडच्या डावातील 12 व्या षटकात ही घटना घडली.

सुशांत जाधव

आसीसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेतील सुपर 12 मधील दुसऱ्या गटातील न्यूझीलंडने नामिबियाला पराभूत करत सेमी फायनलचे तिकीट पक्के केले. न्यूझीलंडच्या डावात कर्णधार केन विल्यम्सनने मारलेल्या स्टेट ड्राइव्हवर अंपायरला चांगलीच कसरत करावी लागली. केन विल्यमसनने मारलेल्या जोरदार फटक्यावेळी अंपायर पॉल रीफेल यांची चेंडूवर करडी नजर होती. त्यामुळेच ते थोडक्यात बचावले. न्यूझीलंडच्या डावातील 12 व्या षटकात ही घटना घडली.

कार्ल ब्रिकेनस्टॉकच्या गोलंदाजीवर विल्यमसनने थेट समोरच्या दिशेने जोरदार फटका खेळला. बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या वेगाने आलेला चेंडूपासून वाचण्यासाठी अंपायरला कसरत करावी लागली. यात ते यशस्वी ठरले. आणि मैदानातील मोठी दुर्घटना टळली. चेंडू अंपायरच्या शर्टला स्पर्श करुन गेला. जर त्यांच्या शरीराला चेंडू लागला असता तर ते गंभीर जखमी झाले असते. किवी कर्णधार केन विल्यमसनने 25 चेंडूत 28 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत केन विल्यमसनने 2 चौकार आणि एक षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले.

शारजाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात नामिबियाने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 163 लावल्या होत्या.

न्यूझीलंडकडून फिलिप्सने 21 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 39 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला नीशमने 23 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 35 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant: दावोस येथे राज्याचा गुंतवणुकीचा विक्रम: उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, दौऱ्यात एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार!

दहावीला ९९ टक्के, नीट परीक्षेत कोकणात अव्वल; डॉक्टर व्हायचं होतं, पण २०व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

Latest Marathi news Live Update: मोबाईलवर स्टेटस ठेवून हत्यारांची विक्री करणारा तरुण अटकेत

Daily Eye Makeup: रोज डोळ्यांचा मेकअप करत असाल तर सावधान! ही एक छोटीशी चूक पडू शकते महाग; अशी घ्या काळजी

Pune Bangalore Highway : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरण कामास गती, कोल्हापुरात येताना कायमची वाहतूक कोंडी संपणार, ब्रिजचे काम सुरू

SCROLL FOR NEXT