Pakistan Cricket Team Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

मॅच आधीच भारताच्या या दोन खेळाडूंचा पाकिस्तानने घेतला धसका

वर्ल्डकपमधील आपला विजयी इतिहास कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल, तर ही परंपरा मोडण्याचा पाकिस्तानी संघ प्रयत्न करेल.

दीनानाथ परब

दुबई: परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्याने टीम इंडिया (Team india) उद्यापासून टी 20 वर्ल्डकपमधील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. विराट कोहली (virat kohli) आणि बाबर आझम (babar azam) दोघेही प्रथमच कर्णधार म्हणून परस्परांसमोर उभे ठाकणार आहेत. कोहली आणि आझम दोघेही जागतिक ख्यातीचे फलंदाज आहेत. वर्ल्डकपमधील आपला विजयी इतिहास कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल, तर ही परंपरा मोडण्याचा पाकिस्तानी संघ प्रयत्न करेल.

१९९२ पासून पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. ५० षटकांचा सामना असो किंवा टी २० भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध वर्ल्डकपमध्ये अजूनपर्यंत तरी अजिंक्य आहे. उद्या होणाऱ्या सामन्याआधी आज पूर्वसंध्येला युनिस खानने, रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान दोघेही आपआपल्या संघासाठी मॅच विनर ठरु शकतात असे म्हटले आहे. युनिस खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता.

"विराट कोहली आणि बाबर आझम या दोन्ही फलंदाजांवर भारतीय आणि पाकिस्तानी संघाची मुख्य भिस्त आहे. पण माझ्यामते रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवानही निर्णायक भूमिका बजावू शकतात. दोन्ही संघाच्या कर्णधारांवर जास्त लक्ष असेल, त्या तुलनेत रोहित आणि रिझवानवर थोडा दबाव कमी असेल. त्यामुळे ते मॅचविनर परफॉर्मन्स देऊ शकतात" असे युनिस खानने 'अनकट' या युट्यूब चॅनलशी बोलताना सांगितले.

"दोन्ही संघांकडे वेगवान गोलंदाजी संतुलित आहे. पण पाकिस्तानी संघाला जसप्रीत बुमराहकडून सर्वात जास्त धोका आहे. पाकिस्तानकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. पण अलीकडच्या काही वर्षात भारतीय गोलंदाजीलाही चांगली धार आली आहे. मागच्या काही महिन्यात बुमराहने दमदार गोलंदाजी केली आहे" असे 43 वर्षीय युनिस खान म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT