T20 World Cup sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : फलंदाजांच्या चुकांमुळे विजय लांबला;दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमचे मत

दक्षिण आफ्रिकन संघाने सोमवारी यजमान वेस्ट इंडीज संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार तीन विकेट राखून विजय मिळवत टी-२० विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

नॉर्थ साऊंड (अँटीग्वा) : दक्षिण आफ्रिकन संघाने सोमवारी यजमान वेस्ट इंडीज संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार तीन विकेट राखून विजय मिळवत टी-२० विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयानंतर दक्षिण आफ्रिकन संघाचा कर्णधार एडन मार्करम याने उपांत्य फेरीत पोहोचल्याचे समाधान व्यक्त करतानाच फलंदाजांच्या फॉर्मबाबत चिंताही व्यक्त केली. १२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग सहज करायला हवा होता. फलंदाजांनी आणखी जबाबदारीने खेळ करायला हवा. फलदाजांकडून चुका झाल्यामुळे विजय लांबला.

दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडीज यांच्यामधील लढतीत पावसाचा व्यत्यय आला. याबद्दल एडन मार्करम म्हणाला, पावसाच्या व्यत्ययानंतर खेळाला सुरुवात झाली तेव्हा खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती. आमच्या संघातील फलंदाजांकडून भागीदारी झाली असती तर ही लढत आधीच संपली असती, पण फलंदाजांना हे शक्य झाले नाही. त्यामुळे विजयासाठी संघर्ष करावा लागला. या लढतीमधून शिकायला मिळाले. पुढे फलंदाजांकडून अशा चुका होणार नाहीत, याकडे लक्ष दिले जाईल, मात्र हा विजय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

वेस्ट इंडीजविरुद्घ खेळताना आम्ही तबरेझ शम्सी या फिरकी गोलंदाजाला संघात संधी दिली, तसेच खेळपट्टीवर चेंडू वळू लागल्यानंतर फिरकी गोलंदाजांना अधिक प्रमाणात गोलंदाजी देण्यात आली. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत झाली असती, तर वेगवान गोलंदाजांना अधिक प्रमाणात षटके देण्यात आली असती. आमचा गोलंदाजी विभाग छान कामगिरी करीत आहे, अशी स्तुती एडन मार्करम याने याप्रसंगी केली.

क्रमवारीत प्रगती - पॉवेल

वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार रोवमॅन पॉवेल याने संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, आम्ही विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत पोहचू शकलो नाही, पण मागील १५ महिन्यांमध्ये आम्ही मोठी झेप घेतली आहे. संघांच्या क्रमवारीत नवव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, तसेच आमच्याकडून दमदार खेळ झाल्यामुळे येथील क्रिकेटप्रेमीही पाठिंबा देत आहेत. आम्ही केलेल्या खेळाबद्दल येथील जनतेला अभिमान वाटत आहे. स्टेडियममध्ये स्फूर्तीगीत ऐकू येऊ लागले आहे. एकूणच काय तर आम्ही योग्य दिशेने पाऊल टाकत आहोत, असे तो पुढे आवर्जून नमूद करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आजपासून आशिया चषकाचा थरार; स्पर्धेत आठ संघ, कधी होणार भारत पाकिस्तान सामना? वाचा संपूर्ण वेळापत्रक...

Vice-President Election : देशाचे १७ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज मतदान; NDAचे राधाकृष्णन अन् INDIA चे रेड्डी यांच्यात लढत

Latest Marathi News Updates: सरकारचा १२ लाखांचा महसूल बुडाला, महसूल मंत्री बावनकुळेंनी महिला अधिकाऱ्याचं केलं निलंबन

Sachin Tendulkar : BCCIच्या अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकर अनुत्सुक? महत्त्वाची अपडेट समोर...नेमकं काय घडतंय?

Solapur fraud: ‘फेड’ फायनान्सची ७२ लाखांची फसवणूक; बनावट कागदपत्रे देणाऱ्या सांगोला, पंढरपूर तालुक्यातील दहा जणांविरुद्ध गुन्हे

SCROLL FOR NEXT