nitin raut nitin raut
क्रिकेट वर्ल्ड कप

‘युएपीए अंतर्गत विराट कोहलीला अटक करणार का?’

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पाकिस्तानने आयसीसीच्‍या सामन्यांमध्ये पहिल्यांदा विजय मिळविलानंतर देशभरात अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. पाकिस्तानचा विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. याचा सोशल मीडियावर चांगलाच विरोध करण्यात आला. तसेच देशातील जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. जल्लोष करणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या कारवाईवर नाराजीचा सूर उमटत आहे. अशात महाविकास आघाडीमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तुम्ही विराट कोहलीला अटक करणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

रविवारी पाकिस्तान आणि भारत यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दहा गड्यांनी भारताला पराभूत व्हाव लागले. भारताच्या पराभवाचा अनेक ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. याचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले. यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या नागरिकांवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली (Unlawful Activities Prevention Act) कारवाई करण्यात येत आहे.

पीडीपीए प्रमुख मेहबूबा मुक्ती यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध यूएपीएअंतर्गत केलेल्या कारवाईचा निषेध केला. तसेच जम्मू-काश्मीर स्टुडंट्स युनियनने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही आरोप रद्द करण्याची विनंती केली आहे. या कारवाईंना कडाडून विरोध होत आहे. यात महाविकास आघाडीतील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक केल्याने युएपीए अंतर्गत अटक करणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मिठी दिल्याचा फोटो व्हायरल

पाकिस्‍तानने विजय मिळविल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मिठी मारली होती. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. खेळाडूंमध्ये मैत्रिपूर्ण संबंध पाहून अनेकांनी कौतुक केले होते. हीच खेळाची गरज असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, देशात युएपीए अंतर्गत होत असलेल्या कारवाईमुळे विराट कोहलीलाच अटक करणार का, असा प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकीय आणि क्रीडा वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT