shardul thakur  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC लॉर्ड शार्दुल Playing 11 मध्ये दिसणार? कोहली म्हणाला...

कोहलीला हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

सुशांत जाधव

कोहलीला हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

India vs New Zealand : न्यूझीलंड विरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीमध्ये हार्दिक पांड्या Playing 11 चा भाग असेल, असे संकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. हार्दिक पांड्या फिट असून तो सहाव्या गोलंदाजाची उणीव भरुन काढू शकतो. त्याच्याशिवाय गरज पडल्यास मी गोलंदाजी करेन, असेही विराटने म्हटले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोहलीला हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

हार्दिक पांड्या फिट, दुसरी संधी मिळण्याचे संकेत

हार्दिक पांड्याच्या फिटनेसवरील प्रश्नावर विराट कोहली म्हणाला की, जर तुम्ही त्याच्या खांद्याच्या दुखापतीसंदर्भात विचारत असाल तर तो तंदुरुस्त आहे. गरज पडल्यास तो सहाव्या गोलंदाजाची भूमिकाही बजावेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही पांड्या खेळेल, असे संकेत मिळत आहेत.

शार्दुल ठाकूरसंदर्भातही कोहलीचे मोठं वक्तव्य

शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑल राउंडर म्हणून संधी मिळेल का? असा प्रश्नही त्याला यावेळी विचारण्यात आला होता. यावर कोहली म्हणाला की, तो आमच्या योजनेचा एक महत्त्वाचा घटक आहे. तो संघातील मौल्यवान खेळाडू असला तरी त्याच्या जागेसंदर्भात सध्या काहीच सांगू शकत नाही.

हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसल्यामुळे त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात घ्यावे, असा सूर सध्या उमटत आहे. पण या मुद्यावर विराट कोहलीने सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्या खेळण्याचे संकेत देत त्याने शार्दुलला खेळवण्याबाबत मौन बाळगल्याचे दिसले. भारतीय संघाला पाकस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर भारतीय ताफ्यातील प्रमुख गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमारवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. यावरही कोहलीने भाष्य केले. भुवीच नव्हे तर कोणत्याच गोलंदाजांना यश मिळाले नाही. पाकिस्तान संघाने आम्हाला संधीच दिली नव्हती, असे सांगत त्याने भुवीची पाठराखणही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : इचलकरंजीत पाणी प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक

Sangli News: ‘आधी मोबदला द्या; मगच वावरात पाय ठेवा’; विटा-बस्तवडे मार्गावर शेकापतर्फे मोर्चा

Asia Cup 2025: भारतीय संघात पुरेशी संधी न मिळण्याबाबत Kuldeep Yadav व्यक्त होणारच होता, पण अचानक माईक बंद झाला अन्...

Maratha Reservation : प्रमाणपत्र मिळाले तरी वैधता कठीण, जीआर कोर्टात टिकणार का? संभाजी ब्रिगेडला शंका

Ichalkaranji Politics : इचलकरंजीत शिंदे गट, भाजपचे टेन्शन वाढवणार? ३५ जागांची केली चाचपणी; महायुतीसाठी वजनदार मंत्र्यांच्या घरी बैठक

SCROLL FOR NEXT