Indian Cricket Team Open Top Bus Parade esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India : टीम धोनीसारखीच रोहितच्या सेनेचीही जंगी परेड; जाणून घ्या क्रिकेटची पंढरी मुंबईत होणाऱ्या स्वागताचं संपूर्ण शेड्युल

Open-top bus parade for Rohit Sharma’s T20 World Cup-winning team in Mumbai: भारतीय संघ अखेर बार्बाडोसमधून मायदेशात येण्यासाठी रवाना झाला आहे. भारतात त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी देखील पूर्ण झाली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Indian Cricket Team Open Top Bus Parade : भारतीय संघाने 29 जूनला दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी 20 वर्ल्डकप आपल्या कवेत घेतला. रात्री जागून टीम इंडियाची ही ऐतिहासिक कामगिरी पाहणाऱ्या चाहत्यांना आपली विश्वविजेती टीम कधी मायदेशात परतणार याची उत्सुकता होती. मात्र बार्बाडोसमध्ये आलेल्या बेरील वादळामुळे टीम इंडिया तेथेच अडकून पडली.

अखेर आज (दि. 3) एअर इंडियाच्या खास विमानाने भारतीय संघ मायदेशात परतण्यासाठी रवाना झाला आहे. या खास विमानात खेळाडू, स्टाफ अन् त्यांचे कुटुंबीय देखील असतील. दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी टीम इंडियाचे मायदेशात कशा प्रकारे स्वागत केलं जाईल याची माहिती दिली. त्यांनी टीम इंडियाच्या स्वागताचे शेड्युल सांगितले.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2007 मध्ये पहिला टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर विजेत्या संघाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यावेळी ओपन टॉप बसमधून संघाची मिरवणूक काढली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. आता त्या संघाचे देखील धोनीच्या संघासारखेच जंगी स्वागत होणार आहे.

भारतात दाखल झाल्यावर कसं असेल टीम इंडियाचं शेड्युल?

भारतीय संघ उद्या ( 4 जुलै) सकाळी सहा वाजता भारतात दाखल होणार आहे. भारतात दाखल झाल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. पंतप्रधानांनी भारतीय संघासाठी नाष्ट्याचे आयोजन केले आहे.

यानंतर भारतीय संघ संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल होईल. भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची ओपन टॉप बसमधून नरिमन पाईंट येथून ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहचल्यानंतर तेथे त्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर या कार्यक्रमावेळी भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टाफ यांना 125 कोटी रूपयांच्या कॅश प्राईजचे बीसीसीआयकडून वितरण केलं जाईल.

याबाबतची सर्व माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

IPL 2026 Auction live : ७७ खेळाडूंचं नशीब बदलणार, २३७.५५ कोटींचा पाऊस पडणार... ऑक्शन केव्हा, कुठे व किती वाजता होणार; जाणून घ्या सर्व माहिती

EPFO Provident Fund : घरबसल्या 1 मिनिटात तपासा आपला PF बॅलन्स! जाणून घ्या EPFO पासबुक पाहण्याचे सोपे, जलद मार्ग आणि नवीन सुविधा

जनावरांच्या बाजारात रिपोर्टिंग करत होती पत्रकार, बैलानं अचानक केला हल्ला; VIDEO VIRAL

Mumbai-Nashik: मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग ४ महिने बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT