IND vs BAN Hardik Pandya  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs BAN : भारतानं मोडला 17 वर्षापूर्वीचा विक्रम; बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात पार केले अनेक माईल स्टोन

T20 World Cup 2024 : विराट कोहली अन् हार्दिक पांड्यासह टीम इंडियाने देखील आजच्या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत.

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Bangladesh : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील सुपर 8 च्या सामन्यात आज भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होत आहे. या लढतीत प्रथम फलंदाजी करत भारताने 20 षटकात 5 बाद 196 धावा केल्या. यात हार्दिक पांड्याने नाबाद 50 धावा केल्या. विराट कोहलीने 37 तर पंतने 36 धावांची खेळी केली. शिवम दुबेही चमकला. त्यानं 24 चेंडूत 34 धावांची खेळी केली. या दरम्यान भारताने तब्बल 13 षटकार मारले.

भारताने टी 20 वर्ल्डकपमधील एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. त्यांनी 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 11 षटकार मारले होते. आता भारताने 13 षटकार मारत हा विक्रम मोडला.

भारताने आजच्या सामन्यात अनेक माईल स्टोन पार केले आहेत. विराट कोहली हा वर्ल्डकपमध्ये 3000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. विराटसोबत टीम इंडियाने देखील अनेक विक्रम केले.

- या मैदानावर टी 20 वर्ल्डकपमध्ये 180 धावांच्या पुढचे आव्हान कधीच चेस झालेले नाही.

- या मैदानावर टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.

- तसेच भारताची ही टी 20 वर्ल्डकपमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वौच्च धावसंख्या ठरली.

- हार्दिक पांड्या हा देखील भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये 300 पेक्षा जास्त धावा आणि 20 पेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

बांगलादेशकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

तनजीम हसन - 11 (2024)

राशिद हुसैन - 11 (2014)

शाकिब अल हसन - 11 (2021)

शाकिब अल हसन - 10 (2016)

अल अमिन हुसैन - 10 (2014)

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT