क्रिकेट वर्ल्ड कप

'टीम इंडिया'ला कोणीही हरवू शकतं; नासिर हुसेनचं रोखठोक मत

विराज भागवत

"भारताचा संघ टी२० वर्ल्ड कपच्या शर्यतीतील लोकप्रिय संघ आहे, पण त्यांच्याकडे..."

T20 World Cup 2021: भारताचा संघ हा सध्या टी२० विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीत पुढे असला तरी भारताच्या संघाला कोणताही संघ कोणत्याही बाद फेरीच्या सामन्यात पराभूत करू शकतो, असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने व्यक्त केलं. "भारताचा संघ सध्याच्या टी२० स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे यात वादच नाही. पण मी याबद्दल थोडासा साशंक आहे. मला असं वाटतं की टी२० क्रिकेटचा प्रकार हा कधीच अंदाज बांधता येणारा नसतो. त्यामुळे भारताच्या संघाला बाद फेरीच्या सामन्यांमध्ये कोणत्याही संघाकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढवू शकते", असं रोखठोक मत नासिर हुसेनने व्यक्त केलं.

Team-India

"खेळ जितक्या कमी षटकांचा असतो, तितकी खेळातील रंजकता वाढते. खेळात काहीही घडू शकतं. एखाद्या फलंदाजाच्या ७०-८० धावा किंवा एखाद्या गोलंदाजाने एकाच षटकात घेतलेल्या २-३ विकेट्स यामुळे सामना पूर्णपणे पलटू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की बाद फेरीच्या कोणत्याही सामन्यात भारताला कोणताही संघ पराभूत करू शकतो. बाद फेरीतील भारताची कामगिरी फारशी चांगली नाही हे आपण गेल्या काही वर्षात पाहिलं आहे", असंही नासिर हुसेनने सांगितलं.

Team India

"भारतीय संघ साखळी फेरीत चांगला खेळ करतो. पण जेव्हा बाद फेरीची वेळ येते, त्यावेळी मात्र भारताला अनेक वेळा फटके बसले असल्याचं दिसून आलं आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरूद्ध भारताला खेळण्याची वेळ आली, त्यावेळी अचानक भारताचा डाव कोसळला. त्यामुळे सामना कमी धावांचा झाला. याचं मोठं निरीक्षण असं की भारताकडे प्लॅन बी नाही. त्याचाच फटका भारताला बसतो. याकडे टीम इंडियाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे", असा मोलाचा सल्ला नासिर हुसेन याने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT