Rohit Sharma Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप हिटमॅनसाठी ठरणार विक्रमी! एक-दोन नाही, तर रोहितला 4 मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेदरम्यान रोहित शर्माला चार मोठे विक्रम करण्याची संधी आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Record: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात रविवारी (5 जून) करणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना आयर्लंडविरुद्ध न्युयॉर्कमध्ये रंगणार आहे.

या स्पर्धेत भारताचा कर्णधार रोहित शर्माला काही मोठे विक्रम करण्याचीही संधी आहे, त्याचबद्दल थोडक्यात आढावा घेऊ.

विराटच्या पंक्तीत स्थान मिळण्याची संधी

रोहित शर्माने या टी20 वर्ल्ड कपमध्ये 26 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करताच तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पार करू शकतो.

जर त्याने असे केल्यास तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा तिसराच क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी असा पराक्रम विराट कोहली आणि बाबर आझम यांनी केला आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 4 जून 2024 पर्यंत)

  • 4037 धावा - विराट कोहली (117 सामने)

  • 4023 धावा - बाबर आझम (119 सामने)

  • 3974 धावा - रोहित शर्मा (151 सामने)

  • 3589 धावा - पॉल स्टर्लिंग (142 सामने)

  • 3531 धावा - मार्टिन गप्टील (122 सामने)

षटकार किंग

रोहित शर्माने या टी20 वर्ल्ड कपमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले, तर तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार पूर्ण करेल. इतकेच नाही, तर तो तीन षटकार मारताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकारही पूर्ण करेल. जर त्याने असे केल्यास तो हे दोन्ही पराक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरेल.

टी20 वर्ल्ड कपमध्ये गाठू शकतो महत्त्वाचा टप्पा

रोहितने जर यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 37 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो या स्पर्धेच्या इतिहास 1000 धावा करणारा तिसराच खेळाडू ठरू शकतो. यापूर्वी असा विक्रम केवळ विराट कोहली आणि माहेला जयवर्धने यांनी केला आहे.

सध्या रोहितच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 39 सामन्यांमध्ये 9 अर्धशतकांसह 963 धावा आहेत. तो टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 4 जून 2024 पर्यंत)

  • 1141 धावा - विराट कोहली (27 सामने)

  • 1016 धावा - माहेला जयवर्धने (31 सामने)

  • 965 धावा - ख्रिस गेल (33 सामने)

  • 963 धावा - रोहित शर्मा (39 सामने)

  • 897 धावा - तिलकरत्ने दिलशान (35 सामने)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT