No GYM Facility for Team India in New York Hotel sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India : न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियासमोर नवे संकट; BCCIनं उचललं मोठं पाऊल

Team India T20 World Cup 2024 : भारतीय संघाने येथे दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत.

Kiran Mahanavar

No GYM Facility for Team India in New York Hotel : टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024 खेळण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. भारतीय संघाने येथे दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. दरम्यान, भारतीय संघासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे, तिथे जिमची चांगली सोय नाही. याच कारणामुळे बीसीसीआयने आता मोठं पाऊल उचललं आहे.

न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नवीन स्टेडियमही तयार करण्यात आले असून जगभरातील अनेक संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत.

मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघाचा अनुभव चांगला राहिला नाही. श्रीलंकेने यापूर्वी प्रवासाबाबत तक्रार केली होती की त्यांना स्टेडियमपासून दूर ठेवण्यात आले होते. तर पाकिस्तानलाही आपले हॉटेल बदलावे लागल्याचे वृत्त आहे.

आता भारतीय संघालाही अडचणींचा सामना करावा लागला आहे. न्यूज 18 च्या बातमीनुसार, टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे त्या हॉटेलमधील जिमची सुविधा खूपच खराब आहे. या कारणास्तव बीसीसीआयने हॉटेलजवळील जिमची मेंबरशिप घेतली.

मात्र, टीम इंडियाला आता न्यूयॉर्कमध्ये जास्त काळ थांबण्याची गरज नाही. न्यू यॉर्कमध्ये भारताचा शेवटचा सामना 12 जून रोजी म्हणजे आजच अमेरिकेविरुद्ध होणार आहे. यानंतर ते ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळण्यासाठी फ्लोरिडाला जातील, जिथे त्यांचा सामना 15 जून रोजी कॅनडाशी होईल.

टीम इंडियाला अमेरिकेला पराभूत करून सुपर-8 मध्ये स्थान मिळवायचे आहे. भारताला आता पुढच्या फेरीत जाण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. जर संघाने यजमान अमेरिकेला पराभूत केले तर सुपर-8 मध्ये स्थान निश्चित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Latest Marathi News Live Update : IIT मुंबईचा वार्षिक कार्यक्रम मूड इंडिगो रद्द

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

SCROLL FOR NEXT