team india victory parade mumbai bus of Gujarat  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Victory Parade : गुजरातच्या बसवरून राजकारण तापलं! मुंबई बेस्टकडे ओपन डेकर नसल्यानं संधी गमावली?

Team India Victory Parade Mumbai Bus of Gujarat : जगज्जेत्या टीम इंडियाच्या मिरवणुकीत गुजरातमधून मागवलेल्या खुल्या डबल डेकर बसवरून राजकारण तापले आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Team India Victory Parade Mumbai Bus of Gujarat : जगज्जेत्या टीम इंडियाच्या मिरवणुकीत गुजरातमधून मागवलेल्या खुल्या डबल डेकर बसवरून राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे; मात्र बेस्ट उपक्रमातील ओपन डबलडेकर बसचे आयुर्मान संपल्याने त्या ताफ्यातून बाद झाल्या आहेत. त्यामुळे विश्‍वचषकविजेत्या संघाच्या स्वागतासाठी बसची बेस्टकडे मागणी करण्यात आली नसल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या इव्हेंटची संधी बेस्टने गमावली असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईची शान आणि वैभवशाली इतिहास असलेली आयकॉनिक डबलडेकर बस १५ सप्टेंबर रोजी बेस्टच्या ताफ्यातून बाद झाल्या. त्यापाठोपाठ डबल डेकर ओपन बसही आयुर्मान संपल्याने त्या ताफ्यातून सहा महिन्यांपूर्वीच बाद झाल्या आहेत. टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी आवर्जून बेस्टच्या बसची मागणी झाली असती; मात्र त्या बाद झाल्याने आता एकही बस बेस्टकडे नाही. त्यामुळे बेस्टला हा मान मिळाला असता; परंतु हा मान आता गुजरातला मिळाला आहे.

बेस्टकडे पाच बस ओपन डबल डेकर होत्या. त्या मुंबईत पर्यटकांसाठी मुंबई दर्शनसाठी वापरण्यात येत होत्या. मुलांच्या सहलींसाठीही त्यांचा वापर होत होता; मात्र सहा-सात महिन्यांपूर्वी त्या आयुर्मान संपल्याने त्या बाद झाल्या आहेत. आता या बस भंगारात गेल्याने त्या गाड्यांचा इतिहास पुसला गेला आहे. २०११ मध्ये टीम इंडियासारख्या इव्हेंटसाठी आता बेस्टच्या निलांबरी या ओपन डबलडेकर गाड्यांचा वापर झाला असता. मात्र यावेळी ह संधी बेस्टने गमावली आहे.

बसवरून राजकारण

या मिरवणुकीसाठी वापरलेल्या गुजरातच्या बसवरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. आमच्याकडे बेस्टच्या बस नव्हत्या. बेस्टच्या ड्रायव्हरला रस्ते माहिती नाही का, ही मिरवणूक बडोद्यात किंवा अहमदाबाद येथे नव्हती. त्यामुळे याचे फार वाईट वाटते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे जितेंद्र आव्हाड यानी केला; तर भारताच्या संघाने विश्‍वचषक जिंकला आहे,

गुजरातच्या किंवा मुंबईच्या संघाने नव्हे, याचे भान समाजाला आहे. त्यामुळे मायावी राजकारण्यांनी जनतेच्या आनंदाच्या क्षणी भेदाभेदाचे निरर्थक वाद आणि भ्रम निर्माण करू नये, असे आवाहन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बेस्टच्या ओपन डबल डेकर बस, बेस्टच्या ताफ्यात जतन करायला हव्या होत्या. त्या ताफ्यातून बाद करणे उचित नाही. अशा महत्त्वाच्या इव्हेंटसाठी त्याचा वापर करता आला असता; मात्र बेस्टने ती संधी गमावली आहे.

- रवी राजा, ज्येष्ठ सदस्य, बेस्ट समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT