Team India Arrival News Jersey  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Arrival : पंतप्रधानांच्या भेटीवेळी टीम इंडियानं घातली खास 'चॅम्पियन्स' जर्सी

Team India Meet PM Narendra Modi : भारताची विश्वविजेती टीम आज बार्बाडोसमधून ट्रॉफी घेऊन दिल्लीत लँड झाली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

अनिरुद्ध संकपाळ

Team India Arrival New Jersey : भारताची टी 20 वर्ल्डकप जिंकणारी टीम आज सकाळी सकाळी 6 वाजता दिल्लीच्या विमानतळावर लँड झाली. दिल्लीच्या विमानतळावर टीम इंडियाचे चाहत्यांनी जंगी स्वागत केले. यानंतर रोहित सेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या निवसास्थानी गेली. पंतप्रधानांना भेटताना टीम इंडियानं नवी अन् खास जर्सी घातली होती.

टीम इंडियाने मोदींना भेटताना जी जर्सी घातली होती. त्या जर्सीवर चॅम्पियन्स असे लिहिले होते. याचबरोबर या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोच्या वरती दोन स्टार देखील आहेत. हे दोन स्टार टीम इंडियाने जिंकलेले दोन टी 20 वर्ल्डकप दर्शवतात.

भारताचा विकेटकिपर बॅट्समन संजू सॅमसनने या नव्या खास जर्सीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. संजू हा भारताच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा एक भाग होता. मात्र त्याला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियाने आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये ही जर्सी घातली अन् त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले.

पंत प्रधानांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीवेळी भारतीय संघाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक स्टाफ अन् बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीच उपस्थितीत होते. खेळाडूंचे कुटुंबीय हे हॉटेल रूममध्ये थांबले होते.

भारतीय संघासहित 70 जणांना घेऊन खास विमान दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यात खेळाडू, प्रशिक्षक, नातेवाईक आणि क्रीडा पत्रकारांचा देखील समावेश होता.

दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत

दिल्लीतील पावसाळी वातावरण होतं. मात्र तरी देखील दिल्ली विमानतळावर क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ते हातात तिरंगा घेऊन टीम इंडियाचे स्वागत करत होते. त्यांच्या हातात त्यांच्या आवडच्या क्रिकेटपटूंचे फोटो देखील होते.

दरम्यान, टीम इंडिया दिल्ली विमानतळावर सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यातच होती. चाहत्यांना आवर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षकांची फौज तैनात करण्यात आली होती. चाहत्यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावाचा जयघोष सुरू केला होता.

दोन बसमधून खेळाडू अन् त्यांच्या कुटुंबीयांना हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये नेण्यात आलं. तिथे टीम इंडियाचं पारंपरिक भांगडा नृत्यानं अन् ढोल वाजवून स्वागत करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी गोळ्या झाडल्या, नंतर कोयत्यानं डोक्यात वार; गणेश काळेच्या हत्याकांडाचा CCTV VIDEO VIRAL

Wrestler Sikandar Sheikh : सिकंदर शेखची पैसा-प्रसिद्धीमुळे कुस्तीशी गद्दारी, वस्तादांसह पैलवान काय म्हणाले...

Maharashtra Protest : महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा वज्रनिर्धार, काळा दिनाच्या निषेध फेरीत हजारो मराठी भाषक सहभागी

Pune Weather Update : पुण्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नाही, नागरिकांना दिलासा

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT