Harmeet Singh | USA Cricket  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Harmeet Singh: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीत सिंगने त्याच्या यशासाठी रोहित शर्माच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांना श्रेय दिले आहे. तो काय म्हणाला जाणून घ्या.

Pranali Kodre

USA Cricket Player Harmeet Singh: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अमेरिका संघही सहभागी झाला असून दमदार कामगिरी करताना दिसला आहे. या संघात अनेक भारतीय वंशाचे खेळाडूही आहेत. त्यात मुंबईत जन्मलेल्या हरमीत सिंगचाही समावेश आहे.

31 वर्षीय हरमीत अमेरिकेत स्थायिक झाला असून गेल्या काही काळापासून अमेरिकेच्या क्रिकेट संघाकडून खेळत आहे. दरम्यान, हरमीतने क्रिकेटचे धडे मुंबईतच गिरवले आहेत. तो भारताकडून 19 वर्षांखालील दोन वर्ल्ड कपही खेळला आहे. तसेच मुंबईकडूनही तो खेळला आहे. मात्र, नंतर तो अमेरिकेला आला आणि इथेच स्थायिक झाला.

तथापि, त्याच्यातील क्रिकेटचे प्रतिभा ओळखण्यासाठी त्याने दिनेश लाड यांना श्रेय दिले आहे. दिनेश लाड हे मुंबईतील प्रतिष्ठीत क्रिकेट प्रशिक्षक असून ते रोहित शर्माचेही लहानपणीचे प्रशिक्षक आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हरमीत आणि रोहित हे दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत.

दरम्यान, मुंबईतील शालेय क्रिकेटमधील आठवणी पीटीआयला सांगताना हरमीत म्हणाला, 'मी माझ्या या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानतो, विशेषत: दिनेश लाड सरांचे.'

'माझ्यातील प्रतिभा सर्वात आधी लाड सरांनी हेरली होती. ते माझे माझ्या शालेय दिवसात प्रशिक्षक आणि मार्गदर्शक होते. खरंतर त्यांनीच मला त्यांच्या शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. तिथे त्यांनी मला त्यांना शक्य असलेली सर्व मदत केली होती.'

हरमीत पुढे म्हणाला, 'मी स्वामी विवेकानंद शाळेत प्रवेश घेतला, तिथे आम्ही अनेक विक्रम मोडले. तेव्हा उपनगरात फार क्रिकेट नसायचे, पण मी जेव्हा मागे वळून पाहातो, तेव्हा सर्वकाही स्वप्नवत वाटते. आम्ही शाळेत जे काही यश मिळवले, ते लाड सरांशिवाय शक्य नव्हते.'

'ते आमच्याबरोबर जिद्दीने काम करायचे आणि आम्हाला पद्माकर शिवलकर सर आणि प्रवीण आमरे सर यांच्या मार्दर्शनाखाली आणखी चांगल्या ट्रनिंगसाठी शिवाजी पार्क जिमखान्यात पाठवायचे.'

दरम्यान, हरमीत आता अमेरिकेकडून सुपर-8 फेरीत खेळताना दिसणार आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतासह अमेरिकेने अ गटातून सुपर-8 फेरीत स्थान मिळवले आहे. अमेरिकेचा सुपर-8 मधील पहिला सामना 19 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 Squad: हार्दिक पांड्याकडे पुन्हा उप कर्णधारपद? शुभमन गिलच्या निवडीवरून माजी खेळाडूचं मोठं विधान, बरोबर १ तासानंतर 'गेम' होणार?

Karad News : कराडमध्ये अंधश्रद्धेचा कळस! शिवसेना महिला पदाधिकाऱ्याचा फोटो वापरून अघोरी कृत्य; धक्कादायक प्रकार समोर...

Thane Politics: ठाकरे गटाला मोठं खिंडार! बड्या शिलेदारानं सोडली साथ, हाती कमळ घेतं भाजपात प्रवेश

Ajwain Water at Night: वजन, पचन आणि पोटाची चरबी! दररोज 21 दिवस ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरात होतात 'हे' बदल

Karad News : सोमनाथ भोसलेंनी साकारलेली ११ फुटी हनुमानाची मूर्ती लवकरच ऑस्‍ट्रेलियाला होणार रवाना

SCROLL FOR NEXT