T20 World Cup 2024 Sandeep Lamichhane  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : संदीप लामिछानेला व्हिसा नाकारला; नेपाळमध्ये युएसविरूद्ध सुरू झालं तीव्र आंदोलन

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Sandeep Lamichhane : यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील अनेक सामने हे युएसएमध्ये होणार आहेत. दरम्यान, युएसएने नेपाळचा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछानेला टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी व्हिसा दिला नाही. त्यामुळं नुकताच बलात्कारच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या संदीपची टी 20 वर्ल्डकप खेळण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे.

दरम्यान, नेपाळमध्ये आता संदीपला युएसएने व्हिसा दिला नाही म्हणून तीव्र आंदोलन सुरू झालं आहे. अनेक लोकं रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त करत आहेत. या आंदोलनात नेपाळच्या अनेक युवकांचा समावेश आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने संदीपला अजूनही व्हिसा मिळू शकतं असं वक्तव्य केलं आहे.

ते आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणतात, 'आम्ही देखील आयसीसीकडे फक्त 14 खेळाडूंचीच यादी पाठवली आहे. कारण आम्हाला आशा होती की युएसए दुतावासाकडून संदीपला व्हिसा मिळेल. आयसीसीने संदीपला टी 20 वर्ल्डकप संघात सामील करण्याची परवानगी आधीच दिली होती. जर संदीपला व्हिसा मिळाला तर त्याला टी 20 संघात सामील करून घेतलं जाईल.'

नेपाळचा स्टार फिरकीपटू संदीप लामिछानेला काठमांडू न्यायालयाने एका 18 वर्षाच्या युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपात दोषी ठरवलं होतं. त्याला आठ वर्षे तुरूंगवास आणि 3 लाख नेपाळी रूपये दंड ठोठावण्यात आला होता. या शिवाय पीडितेला 2 लाख नेपाळी रूपये देण्याचे देखील आदेश दिले होते.

मात्र संदीपने या विरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली अन् उच्च न्यायालयाने संदीप लामिछानेला निर्दोष ठरवलं. त्यांनी काठमांडू कोर्टाचा निर्णय बदलला होता. यानंतर संदीपची वर्णी नेपाळच्या टी 20 संघात लागली होती. संदीप हा नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT