Super-Saver-Hardik 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs NZ Video: याला म्हणतात फिल्डिंग! हवेतच अडवला सिक्स...

हार्दिक पांड्याने जोर लावून मारला होता हवाई फटका | Super Save on Boundary Line

विराज भागवत

हार्दिक पांड्याने जोर लावून मारला होता हवाई फटका | Super Save on Boundary Line

IND vs NZ, T20 World Cup 2021: भारतीय संघासाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या सामन्यात खेळाडूंनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे सपशेल शरणागती पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, ऋषभ पंत हे बडे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी थोडीशी झुंज दिल्याने भारताला कशीबशी शंभरी ओलांडता आला. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने टीम इंडियाच्या फलंदाजांना २० षटकात ७ बाद ११० धावांत रोखले.

एकीकडे मोठी खेळी करण्यास भारतीय फलंदाज असमर्थ ठरत असतानाच न्यूझीलंडच्या फिल्डर्सनेदेखील अनेक धावा वाचवल्या. हार्दिक पांड्याने मारलेल्या फटक्यावर जिमी निशमने केलेली फिल्डिंग चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली. हार्दिक पांड्याने स्पिनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळला. चेंडू षटकार जाणार असं वाटत असताना जिमी निशमने तो चेंडू हवेत उडी मारून आतमध्ये ढकलला आणि षटकार वाचवला.

पाहा निशमची अफलातून फिल्डिंग-

दरम्यान, आज इशान किशनला सूर्यकुमार यादवच्या जागी संघात स्थान देण्यात आले. त्यामुळे तो लोकेश राहुलसोबत सलामीला उतरला. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. इशान किशन ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा १४, लोकेश राहुल १८, विराट कोहली ९, ऋषभ पंत १२ असे सारे फलंदाज स्वस्तात बाद झाले. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा या दोघांनी काही काळ झुंज दिली. पांड्या २३ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर जाडेजाने शेवटपर्यंत पिच सांभाळत नाबाद २६ धावा केल्या. हीच भारताच्या डावातील सर्वोत्तम खेळी ठरली. ट्रेंट बोल्टने ३, इशा सोढीने २ तर मिल्न आणि साऊदीने १-१ बळी टिपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT