Hardik Pandya | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Victory Parade: वानखेडेवर सेलिब्रेशनवेळी हार्दिकच्या हातात फॅनने फेकलेला शर्ट आला अन् मग बुमराह...

T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांबरोबर आनंद साजरा करत असतानाच अचानक हार्दिक पांड्याच्या हातात चाहत्याने फेकलेला शर्ट आला होता.

Pranali Kodre

Team India Celebration at Wankhede Stadium: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा २९ जून रोजी जिंकल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी (४ जुलै) मायदेशी परतला. मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार स्वागत झालं.

दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर गुरुवारी संध्याकाळी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला होता. मुंबईत पोहचल्यानंतर भारतीय संघाची नरिमन पाँइंट ते वानखेडे स्टेडियमदरम्यान ओपन बसमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा सन्मान करण्यात आला होता.

या सन्मान सोहळ्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला फेरी मारली. यावेळी खेळाडू चाहत्यांचा उत्साह वाढवताना दिसत होते. याचवेळी स्टेडियमवर माँ तुझे सलाम हे गाणं वाजत असताना खेळाडूही चाहत्यांबरोबर ते गाणं गात होते.

पण याचवेळी चाहत्यांमधून कोणीतरी एक शर्ट मैदानाच्या दिशेने फेकला, तो शर्ट नेमका हार्दिक पांड्याच्या हातात आला. एकाक्षणी हार्दिकही ते पाहून गोंधळल्यानंतर त्याने तो लगेचच खाली टाकला आणि तो पुन्हा सेलीब्रेशन करू लागला.

मात्र, हार्दिकच्या हातात अचानक आलेला शर्ट पाहून त्याच्या मागेच असलेल्या जसप्रीत बुमराहला मात्र त्याचे हसू रोखता आले नाही. काही वेळाने अखेर हसणाऱ्या बुमराहकडे वळून नंतर हार्दिकनेही त्याला टाळी दिली. दरम्यान, या क्षणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारतीय संघाच्या या विजयोत्सवावेळी चाहत्यांचा मोठा उत्साह दिसून आला. मरिन ड्राईव्हवर हजारो चाहत्यांची गर्दी भारतीय संघाला पाहण्यासाठी जमली होती.

भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले होते. अंतिम सामन्यानंतर बार्बाडोसला आलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय संघ काही दिवस तिथे अडकला होता. मात्र, त्यानंतर गुरुवारी भातीय संघ मायदेशी परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

India Women Team Olympics 2028: भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं; पुरुष संघाचं काय?

Aurangabad Farmer: पेरणी करताना काळाचा घाला! सिल्लोडमध्ये शेतकऱ्यावर वीज कोसळून जागीच मृत्यू, कुटुंबाचा आधार हरपला..

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

SCROLL FOR NEXT