Suryakumar Yadav | Rohit Sharma | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: सूर्याने कॅच घेण्यापूर्वी षटकार समजून रोहित झालेला हताश? फायलनमधील Video व्हायरल

Suryakumar Yadav Catch: टी२० वर्ल्ड कप २०२४ अंतिम सामन्यात सूर्यकुमारने अखेरच्या षटकात महत्त्वाचा झेल घेतला होता. याचदरम्यान रोहितची रिअ‍ॅक्शन कशी होती, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२४ अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे.

बार्बाडोसला झालेला अंतिम सामना अत्यंत रोमांचक झाला होता. या सामन्यात अखेरच्या षटकात सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल महत्त्वाचा ठरला होता.

या सामन्यात १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. डेव्हिड मिलर फलंदाजी करत होता. त्याने हार्दिक पांड्याने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोरदार शॉट खेळला.

मात्र त्यावेळी बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या सूर्यकुमारने तो चेंडू झेलला, परंतु नियंत्रण सुटत असल्याने तो चेंडू त्याने पुन्हा वर फेकत बाऊंड्री लाईनवरून बाहेर येत पकडला. त्यामुळे मिलरला २१ धावांवर विकेट गमवावी लागली.

ही विकेट अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे भारताला विजय मिळवणं सोपं गेलं. दरम्यान याच क्षणाचा एका वेगळ्या अँगलचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात सूर्यकुमारने योग्य झेल घेतल्याचे दिसत आहे.

तथापि, या व्हिडिओमध्ये जेव्हा मिलरने हा शॉट खेळलेला, तेव्हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा गुडघ्यावर हात ठेवून सुरुवातीला षटकार गेल्याचे समजून हताश झालेला दिसला होता. मात्र नंतर सूर्यकुमारचा झेल पाहून सर्वच भारतीय खेळाडू खूश झाले. दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ असून सकाळ याची पुष्टी करत नाही.

मिलर बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हन्रिक क्लासेनने ५२ धावांची खेळी केली होती.

भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. आर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेलने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी भारताकडून विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने ४७ धावा, तर शिवम दुबेने २७ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना एन्रिक नॉर्किया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिनने १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स चमकले?

Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीला मिठाशी संबंधित 'या' गोष्टी करा, आर्थिक अडचणी दूर होतील

Latest Marathi News Live Update : मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये २५ तृतीयपंथियांनी विष घेतले

Pakistan Semi Final Scenario WC: पाकिस्तानची 'नौका' श्रीलंकेतच बुडणार! उपांत्य फेरी सोडाच, हे तर तालिकेत तळावरच राहणार

Viral Video: मुंबईत राम मंदिर स्टेशनवर ‘थ्री इडियट्स’चा खऱ्या आयुष्यात सीन, व्हिडिओ कॉलवर झाली प्रसूती... 'हा' ठरला रँचो

SCROLL FOR NEXT