Virat Kohli IND vs AUS esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli : बोलतो तसं करतो! कॅप्टन काही बॉल टू रन... अश्विनकडून रोहितची स्तुती की विराटला टोमणा?

T20 World Cup 2024 : अश्विनने सोशल मीडियावर पोस्ट करत रोहितचं कौतुक केलं तर विराट कोहलीला चांगलंच ट्रोल केलं.

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IND vs AUS : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने विराट कोहलीला चांगलाच टोमणा हाणला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर 8 च्या सामन्यादरम्यान विराट कोहली पुन्हा एकदा शुन्यावर बाद झाला. विराट कोहलीने 5 चेंडू खेळले मात्र त्याला एकही धाव करता आली नाही. दुसरीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्माने 42 चेंडूत 92 धावा ठोकल्या. यावर रविचंद्रन अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया रोहितची स्तुती करणारी होती की विराटला टोमणा मारणारी अशी चर्चा सुरू झाली आहे.

रविचंद्रन अश्विनने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणतो की, 'आश्वासन देतो की रोहितनं जर शंभर केला तर तो नक्कीच बॉल टू रन असणार नाही. कर्णधार जसं बोलतो तसं करतो.' या पोस्टद्वारे अश्विनने रोहितचे कौतुक केलं. मात्र त्यानं विराटबद्दल देखील कमेंट केली.

तो म्हणतो की, कोहलीला आपलं खातं उघडता आलं नाही. भारताच्या माजी कर्णधाराचा वाईट फॉर्म सुरू आहे. तो टी 20 वर्ल्डकपमध्ये पुन्हा शुन्यावर बाद झाला. मात्र रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. रोहितने विध्वंसक युद्ध पुराकलं होतं. त्याने 41 चेंडूत 92 धावा ठोकल्या अन् भारताला चांगल्या स्थितीत पोहचवलं.

रोहित शर्माने दावा केला की जर रोहित शंभर केला असता तर त्याने 100 चेंडूत शतकी खेळी नक्कीच केली नसती. रोहितने लिडिंग फ्रॉम फ्रंटचं उदाहरण ठेवत 7 चौकार आणि 8 षटकार मारत 224.39 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT