Virat Kohli Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli: विराट टी20 वर्ल्ड कपसाठी अखेर अमेरिकेला रवाना, टीम इंडियाच्या सराव सामन्यात खेळणार?

T20 World Cup 2024: विराट कोहली टी20 वर्ल्ड कपसाठी गुरुवारी अमेरिकेला रवाना झाला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli departs for USA: वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे 1 ते 29 जून दरम्यान टी20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी होणारे सर्व संघ तिथे पोहचले असून सराव सामने खेळण्यात व्यस्त आहे. भारतीय संघही सध्या न्युयॉर्कमध्ये असून तयारी करत आहे.

दरम्यान, आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील आगामी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेला गुरुवारी (30 मे) रवाना झाला आहे. त्यामुळे तो आता लवकरच भारतीय संघाशी जोडला जाईल.

तो या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात सहभागी होणारा अखेरचा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी अन्य सर्व खेळाडू आधीच संघाशी जोडले गेले असून त्यांच्या सरावालही सुरुवात झाली आहे.

विराटने आयपीएल 2024 नंतर बीसीसीआयकडे छोट्या सुट्टीची मागणी केली असल्याचे रिपोर्ट्स समोर आले होते. त्यामुळेच तो भारतीय संघात कधी सामील होणार, याबाबत सांशकता होती. पण अखेर तो गुरुवारी अमेरिकेला रवाना झाला.

तथापि, विराट अमेरिकेला रवाना झाला असला, तरी तो मोठा प्रवास केल्यानंतर भारताच्या सराव सामन्यासाठी उपलब्ध असणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. भारताला 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. हा सामना न्युयॉर्कला खेळवला जाणार आहे.

विराट आहे दमदार फॉर्ममध्ये

दरम्यान, विराटच्या नजीकच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले, तर तो दमदार लयीत खेळत आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2024 स्पर्धेत 15 सामन्यांत 61.75 च्या सरासरीने आणि 155 च्या स्ट्राईक रेटने 741 धावा केल्या होत्या.

यात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके केली. तो आयपीएल 2024 मधील सर्वाधिक धावा करणाराही क्रिकेटपटू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी छाननी समिती स्थापन

Kolhapur Crime News : ‘तुला बाळ होत नाही’ पती, सासू, दीर, जाऊ सगळ्यांनी छळलं; शेवटी विवाहितेनं जे केलं ते धक्कादायक, कोल्हापुरातील घटना

अग्रलेख - जो दुसऱ्यावरी विसंबला...

पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार! प्राजक्ताची नवी वेबसीरिज 'देवखेळ' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवी पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT