Team India Victory Parade Team India Victory Parade
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Victory Parade : कोहली, जडेजाचा मुंबई पोलिसांना सॅल्यूट! मिरवणुकीचे व्यवस्थापन अव्वल दर्जाचे

Kiran Mahanavar

भारताचा महान फलंदाज विराट कोहली व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनी गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या मिरवणुकीचे व्यवस्थापन अव्वल दर्जाचे असल्याकारणाने येथील पोलिसांचे कौतुक केले आहे. विश्‍वविजेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या जनसागराला नियंत्रणात ठेवल्याबद्दल कोहली व जडेजा यांनी मुंबई पोलिसांची स्तुती केली.

भारतीय संघाने वेस्ट इंडीजमध्ये टी-२० विश्‍वकरंडक पटकावल्यानंतर गुरुवारी मायदेशात त्यांचे आगमन झाले. पहाटे नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत संवाद साधला. त्यानंतर विश्‍वविजेता संघ मुंबईत दाखल झाला. मुंबईतील विमानतळापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास वानखेडे स्टेडियमवर थांबला. असंख्य क्रिकेटप्रेमींनी वानखेडे स्टेडियम गाठले. आपल्या लाडक्या खेळाडूंनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीला मानवंदना देण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमी तिथे पोहोचले होते. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

विराट कोहली याने सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे आभार मानले. तो म्हणाला, टीम इंडियाच्या मिरवणुकीदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुंबई पोलिसांना धन्यवाद. तुमचे समर्पण आणि सेवा अत्यंत प्रशंसनीय आहे. रवींद्र जडेजाकडूनही सोशल मीडियावर आभार व्यक्त करण्यात आले.

विश्‍वविजेत्यांचा अभिमान

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्‍विन यानेही विश्‍वविजेत्यांचा अभिमान असल्याचे मत सोशल मीडियावरून व्यक्त केले. तो म्हणाला, नवी दिल्ली व मुंबई येथील सेलिब्रेशनचे व्हिडीआे व फोटो बघितले. मन भरून आले. या देशातील जनता या खेळावर निरतिशय प्रेम करणे हे यावरून प्रकर्षाने दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT