Virat Kohli Rohit Sharma esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli Rohit Sharma : रोहितने 9 तर विराटने खेळले 6 टी 20 वर्ल्डकप; अखेर विजेतेपदानं झाली दैदिप्यमान कारकिर्दीची सांगता

T20 World Cup 2024 : रो-को युगाचा अंत; अखेर टी20 वर्ल्डकप विजेतेपदानं झाली कारकिर्दीची सांगता

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Rohit Sharma : भारताने तब्बल 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्डकप जिंकला. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गज खेळाडूंनी त्याक्षणीत टी 20 मधून आपली निवृत्ती जाहीर केली. हे दोघे हा फॉरमॅट भारताला टी 20 वर्ल्डकप जिंकून देण्यासाठीच खेळत होते. एकाची टी 20 कारकिर्द 2007 पासून तर दुसऱ्याची 2010 पासून सुरू झाली होती.

यंदाच्या टी 20 वर्ल्डकप फायनलमध्ये विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताला वर्ल्डकप जिंकता आला. त्यानंतर विराट कोहलीने सामना झाल्यावर आपण टी 20 मधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केलं. रोहितने पत्रकार परिषदेवेळी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

रोहित शर्माने 2007 च्या पहिल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पदार्पण केलं होतं. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात त्याने टी 20 पदार्पण केलं होते. त्याने तेव्हापासून रोहितने भारताकडून 159 टी 20 सामने खेळले आहेत. यात 4231 धावा केल्या आहेत. त्याने आपली कारकीर्द ही भारताकडून टी 20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करून संपवली.

रोहितने आपल्या टी 20 कारकिर्दीत 5 शतकी खेळी केल्या आहेत. त्याने अफगाणिस्तानविरूद्ध 121 धावा केल्या होत्या. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोकृष्ट खेळी ठरली. याचबरोबर रोहितने 32 अर्धशतकी खेळी देखील केल्या आहेत. रोहितने कर्णधार म्हणून भारताला 50 विजय मिळवून दिले आहेत.

दुसरीकडं विराट कोहलीने जून 2010 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आतापर्यंत भारताकडून 125 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात 4188 धावा केल्या आहेत. यात एका शतकी खेळीचा समावेश आहे. तर 38 अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

त्याने टी 20 वर्ल्डकप 2014 आणि 2016 मध्ये दोनवेळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे. विराट कोहली हा रोहित शर्मानंतर भारताकडून टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT