Ind vs Sa T20 WC 24 Final SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Sa T20 WC 24 Final : रोहितचं टेन्शन वाढलं! 3 अडचणींमुळे टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगणार?

आता भारतीय संघ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. हा सामना बार्बाडोस येथे 29 जून रोजी होणार आहे.

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 World Cup 2024 Final : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत इंग्लंडवर 68 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 181/7 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने (57) उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तर इंग्लंडचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत 103 धावांत ऑलआऊट झाला.

आता भारतीय संघ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. हा सामना बार्बाडोस येथे 29 जून रोजी होणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी भारताला तीन अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे टी-20 चॅम्पियन बनण्याचे त्याचे स्वप्न भंगले जाऊ शकते.

ऋषभ पंतची बॅट अचानक झाली शांत

ऋषभ पंतही मोठ्या सामन्यांमध्ये धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पंत लवकर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ज्यामुळे नंतर आलेल्या फलंदाजांवर दबाव निर्माण झाला. पंतचा हा खराब फॉर्म पाहून त्याच्या जागी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याची मागणीही चाहते करत आहेत.

शिवम दुबेचा फ्लॉप परफॉर्मन्स

डावखुरा फलंदाज शिवम दुबे या स्पर्धेत मिळत असलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. दुबे आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळून आपली छाप सोडू शकलेला नाही. त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुबे इंग्लंडविरुद्ध गोल्डन डकचा बळी ठरला. दुबेची कामगिरी अंतिम सामन्यातही अशीच राहिल्यास संघाला नुकसान सहन करावे लागू शकते.

विराट कोहलीचा खराब फॉर्म

स्टार फलंदाज विराट कोहली स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपल्या खराब फॉर्मशी झगडत आहे. ओपनिंग करताना रोहितसह कोहली आतापर्यंत संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. अंतिम सामना जिंकण्यासाठी भारताला चांगली सुरुवात करावी लागेल. अशा स्थितीत कोहलीची बॅट चालणे खूप महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT