Team India | Rohit Sharma Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Captain: रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या नाही, तर 'या' खेळाडूने करावे टीम इंडियाचे नेतृत्व, सेहवागने सांगितलं नाव

Virender Sehwag on Team India Captaincy: रोहित शर्मानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला मिळायला हवं, याबाबत वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Sharma: भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी युवा शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

वीरेंद्र सेहवागनेही आगामी काळात रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल संघाचा कर्णधार असावा असे म्हटले आहे. एकप्रकारे वीरेंद्र सेहवागने हार्दिक पांड्याला पुढचा कर्णधार म्हणून अप्रत्यक्षरित्या नकार दिला आहे.

शुभमन गिल झिम्बाब्वेविरुद्ध संघाचे नेतृत्व करेल. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यासह अनेक वरिष्ठ क्रिकेटपटूंना टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर विश्रांती देण्यात आली आहे.

वीरेंद्र सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला, "शुबमन गिल दीर्घकाळ संघात राहील. तो तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू आहे. गेल्या वर्षीची त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपला मुकणे दुर्दैवी होते. माझ्या मते, तो कर्णधार असावा. हा निर्णय घेणे योग्य आहे. उद्या जेव्हा रोहित शर्मा संघ सोडेल तेव्हा कर्णधारपदासाठी शुभमन गिल हा त्याचा योग्य पर्याय असेल."

टी-२० वर्ल्डकप २०२४ संघातील केवळ शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांची झिम्ब्बावे दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. यातील जयस्वाल आणि सॅमसन यांना टी२० वर्ल्डकपमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

तसेच रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचे राखीव खेळाडू होते. या खेळाडूंनाही झिम्ब्बावे दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे यांची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर प्रथमच टी-२० संघात निवड झाली आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील कुमार अहमद, मुकेश आणि तुषार देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT