Wasim Jaffer wants Rohit Sharma to bat at no. 4  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : रोहित शर्माचा पत्ता कट... 'ही' जोडी करणार ओपनिंग? वर्ल्ड कपपूर्वी भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Team India T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेत पोहोचली आहे.

Kiran Mahanavar

Team India T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेत पोहोचली आहे. आतापर्यंत चाहते आयपीएल 2024 चा आनंद लुटत होते. आता 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपचा आनंद लुटता येणार आहे. मात्र, वेळेतील फरकामुळे भारतातील ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे.

वर्ल्ड कपपूर्वी भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाला टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आणि टीम इंडियाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघासाठी सलामी देऊ नये, असे वसीम जाफरने म्हटले आहे.

खरंतर, टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यांची जोडी सलामीला येणार आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. मात्र, नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने ओपनिंग करताना खूप धावा केल्या होत्या. आणि त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पण जिंकली होती.

पण वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माला मधल्या फळीत खेळवण्यामागे वसीम जाफरने मोठे कारण सांगितले आहे. त्याच्या म्हणण्यानूसार रोहित शर्मा फिरकीपटूंना चांगला खेळवतो आणि त्यामुळेच त्याने ओपनिंगऐवजी मधल्या फळीत खेळावे.

सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करत वसीम जाफर म्हणाला की, माझ्या मते, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी टी-20 वर्ल्ड कपदरम्यान सलामी दिली पाहिजे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. रोहित शर्मा फिरकीपटूंना चांगला खेळवतो, त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे त्याच्यासाठी कोणती मोठी समस्या नसले.

भारतीय संघासाठी रोहित शर्मा बर्याच काळापासून ओपनिंग करत आहे. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. अशा परिस्थितीत हे दोन दिग्गज टी-20 वर्ल्ड कपदरम्यान आपल्या फलंदाजीचा क्रम बदलतात की नाही हे पाहायचे आहे.

टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघाला 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. याआधी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सराव सामनाही खेळणार आहे. उभय संघांमधील हा सामना 1 जून रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT