India vs Afghanistan T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Afg Super-8 : पावसामुळे भारत-अफगाण सामना रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? काय आहे सुपर-8चा नियम

India vs Afghanistan T20 World Cup 2024 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर-8 सामना 20 जून रोजी केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे होणार आहे. पावसाने सामन्यात व्यत्यय आणला तर दोन्ही संघांचे काय नुकसान होईल?

Kiran Mahanavar

Ind vs Afg T20 World Cup 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या साखळी टप्प्यात चमकदार कामगिरी केली आणि तिन्ही सामने जिंकून सुपर-8 मध्ये स्थान मिळवले. आता भारत वेस्ट इंडिजमध्ये सुपर-8 सामना खेळणार आहे, ज्याची सुरुवात 20 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याने होईल.

उभय संघांमधील हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल. हवामानाचा अंदाज पाहिल्यास, पुढील काही दिवस ब्रिजटाऊनमध्ये आकाश ढगाळ राहील. सामन्याच्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल?

टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सुपर-8 2 गटात विभागला गेला आहे. गट-1 मध्ये अमेरिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आहे. तर, ग्रुप-2 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. आता ही स्पर्धा आणखीनच रोमांचक होणार आहे.

आता या 8 संघांमध्ये उपांत्य फेरी गाठण्याची लढाई रंगणार आहे. एका गटात असलेल्या 4 संघांना 3-3 सामने खेळावे लागतील. उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी संघांना किमान 2-2 सामने जिंकावे लागतील. टीम इंडियाने ग्रुप 1 मधील तिन्ही सामने जिंकले तर जास्तीत जास्त गुणांच्या आधारे ते थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

भारत-अफगाणिस्तान सामन्यात पाऊस पडला तर?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर-8 सामना 20 जून रोजी होणार आहे. जर IND vs AFG सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. असे झाल्यास टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात, कारण त्यांचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध आणि तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. ऑस्ट्रेलिया नेहमीच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT