India vs USA Super-8 Qualification sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs USA सामना पावसामुळे रद्द झाला तर... पाकिस्तानचे देव पाण्यात, जाणून घ्या समीकरण

India vs USA Super-8 Qualification : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे.

Kiran Mahanavar

What happens to Group A Super 8 qualification scenarios : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. जो संघ जिंकेल तो सुपर-8 साठी पात्र ठरेल. त्यामुळे भारत आणि अमेरिका या दोघांनाही आजचा सामना जिंकायचा आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या नजराही या सामन्यावर लागत्या आहेत. या सामन्याचा निकाल त्यांच्यासाठीही खूप महत्वाचा आहे. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोणाला फायदा होईल असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

याआधी पावसाने भारत-पाकिस्तान सामन्यात व्यत्यय आणला होता. म्हणूनच भारत-अमेरिका सामन्यादरम्यान पाऊस पडेल की नाही हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. जर आपण न्यूयॉर्कच्या हवामानाबद्दल बोललो तर 12 जून रोजी 25 टक्के पाऊस अपेक्षित आहे. पण, न्यूयॉर्कच्या हवामानाबद्दल काहीही सांगता येत नाही, कारण येथे हवामान कधीही बदलते. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानही 30-40 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र तरीही पावसाने सामना विस्कळीत केला.

अशा परिस्थितीत जर पाऊस पडला आणि त्यामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला, तर भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील आणि पाकिस्तानचा संघ बाहेर पडेल. कारण भारत आणि अमेरिका या दोघांना प्रत्येकी एक गुण मिळून त्यांचे 5 गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरीही ते केवळ 4 गुणांपर्यंत पोहोचू शकतील आणि स्पर्धेतून बाहेर पडतील.

या कारणामुळे आजचा सामना पूर्ण व्हावा आणि भारतीय संघाने अमेरिकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे. भारताने अमेरिकेला एकतर्फी हरवले तर पाकिस्तानसाठी सुपर-8 चे दरवाजे उघडतील. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला, तर पाकिस्तानच्या इच्छाही धुळीस मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT