T20 World Cup 2024 USA vs Pakistan News sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

USA vs Pakistan : पाकिस्तानला धक्का देण्यासाठी मैदानात उतरणार अमेरिका! किती वाजता रंगणार सामना?

T20 World Cup 2024 USA vs Pakistan News : पाकिस्तानचा मार्ग खडतर... यजमान अमेरिकेशी आज सामना

Kiran Mahanavar

T20 WC 2024, USA Vs Pakistan Match : मागील टी-२० विश्‍वकरंडकात उपविजेता ठरलेला पाकिस्तानचा क्रिकेट संघ यंदाच्या टी-२० विश्‍वकरंडकातील अ गटातील सलामीच्या लढतीत यजमान अमेरिकन संघाचा सामना करणार आहे, पण या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघाला भिन्न परिस्थितींमधून जावे लागले आहे.

विपरीत परिस्थितीमधून सावरत पाकिस्तानला फॉर्ममध्ये असलेल्या अमेरिकेचा सामना करावयाचा आहे. अमेरिकेने सलामीच्या लढतीत कॅनडावर दमदार विजय मिळवत आत्मविश्‍वास कमावला आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी आजचा (ता. ६) पेपर सोपा नसेल एवढे मात्र निश्‍चित आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळला जाईल.

पाकिस्तानी संघाला मायदेशात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये न्यूझीलंडविरुद्ध २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या टी-२० लढतीत त्यांना हार पत्करावी लागली. मागील आठवड्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-० अशा फरकाने निराशेचा सामना करावा लागला. एकूणच काय तर टी-२० विश्‍वकरंडकाआधी मैदानातील पाकिस्तानची कामगिरी सुमार झालीय, असे म्हणायला हरकत नाही.

कर्णधारपदाचा गोंधळ

पाकिस्तानी संघामध्ये कर्णधारपदावरून गोंधळ उडाला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्याकडे काही काळापुरते टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते, पण आता पुन्हा एकदा बाबर आझमकडे पाकिस्तानचे नेतृत्व देण्यात आले आहे. शाहीन शाह आफ्रिदीकडे उपकर्णधारपद देण्यात आले होते, पण त्याने ते स्वीकारले नाही. यावरूनच सध्या तरी पाकिस्तानच्या संघात खेळाडूंमध्ये समन्वय असण्याची शक्यता कमी दिसून येण्याची शक्यता आहे.

आझम, रिझवानच्या फलंदाजी स्ट्राईक रेटमुळे चिंता

बाबर आझम व मोहम्मद रिझवान या दोन खेळाडूंवर पाकिस्तानची फलंदाजी अवलंबून आहे, पण दोघांचाही फलंदाजी स्ट्राईक रेट हा कमी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा चिंतेचा विषय असणार आहे. अर्थात बाबर याने टी-२० क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

पाकिस्तानचा संघ त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारीस रौफ, मोहम्मद आमीर हे वेगवान गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. इमाद वासीम हा दुखापतीमुळे अमेरिकेविरुद्धच्या लढतीत सहभागी होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT