Fox Appearance at T20 Blast Cricket Match Sakal
Cricket

Fox in Cricket Ground: पाहावं ते नवलंच! क्रिकेटच्या मैदानाच चक्क कोल्ह्यानं ठोकली धूम, Video होतोय तुफान व्हायरल

Fox on the Cricket Field: एका टी२० क्रिकेट सामन्यादरम्यान चक्क एक कोल्हा मैदानात घुसल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Fox Appearance at T20 Blast Cricket Match: क्रिकेटमध्ये अनेकदा विचित्र घटना घडताना दिसून येतात. अनेकदा क्रिकेट सामन्यांत पाऊस-वारा याव्यतिरिक्त श्वान, साप, पक्षी किंवा मधमाशा आल्याने व्यत्यय आल्याचे दिसून आले आहे. पण आता चक्क कोल्हाच क्रिकेटच्या मैदानात घुसल्याचे दिसले आहे.

सध्या इंग्लंडमध्ये विटालिटी ब्लास्ट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत हॅम्पशायर विरुद्ध सरे या सामन्यांत घडली. हा सामना लंडनमध्ये खेळवला जात होता. त्यावेळी अचानक एक कोल्हा मैदानात घुसला.

दरम्यान, त्यामुळे थोडी भिती निर्माण झाली होती, पण कोल्ह्याने कोणालाही इजा केली नाही. तो धावत आला आणि तसाच मैदानातून बाहेर गेल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते.

ही घटना हॅम्पशायरच्या डावातील सहा षटकात घडली. दरम्यान तो कोल्हा बाहेर गेल्यानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात झाली.

या सामन्यात हॅम्पशायनरने १९.५ षटकात सर्वबाद १८३ धावा केल्या. त्यांच्याकडून टॉबी अल्बर्टने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तसेच सरेकडून जॉर्डन क्लार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर सरेने १९.१ षटकात १८४ धावांचे आव्हान ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यामुळे हा सामना ५ विकेट्सने जिंकला. सरेकडून सॅम करनने १०२ धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ६ षटकार मारले. हॅम्पशायरकडून ब्रॅड व्हिल आणि जॉन टर्नर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT