Hanuma Vihari aakash chopra
Hanuma Vihari aakash chopra esakal
क्रिकेट

Hanuma Vihari Controversy : तो काही असा-तसा खेळाडू वाटला का.... विहारी प्रकरणावरून माजी क्रिकेटपटू भडकला

अनिरुद्ध संकपाळ

Hanuma Vihari Controversy : हनुमा विहारी आणि आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. हनुमा विहारीने त्याला एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलावर ओरडल्यामुळे कर्णधारपद गमवावे लागल्याची पोस्ट केली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली.

यानंतर हनुमाची तक्रार करणाऱ्या खेळाडूने देखील आपली बाजू मांडली. त्यामुळे कोणांच खरं अन् कोण चुकलं यासाठी आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने एक चौकशी समिती स्थापन केली आहे.

दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने हनुमा विहारीला पाठिंबा दर्शवला आहे. त्याला हनुमा विहारीचं म्हणणं योग्य वाटतं. चोप्रा म्हणाला की, 'चिखलफेक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना दोष देण्यात येत आहे. क्रिकेट जगतानं कायम खेळाडूवर विश्वास ठेवला पाहिजे.'

'हनुमा विहारी हा काही असा-तसा खेळाडू नाही. त्याने आंध्र प्रदेशसाठी एक हात फ्रॅक्चर असताना दुसऱ्या हाताने फलंदाजी केली आहे.'

चोप्रा पुढे म्हणाला की, 'त्याचा आतापर्यंतचा प्रवास जबरदस्त राहिला आहे. त्याने आंध्र प्रदेशला रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीत पोहचवण्यात मोठा वाटा उचलला आहे. त्याने संघाला एकसंध ठेवलं होत. त्याच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.'

'त्याने सिडनी कसोटीत हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असतानाही फलंदाजी केली होती. त्याने त्याची संपूर्ण कारकीर्द पणाला लावली. त्यानंतर त्याने आंध्रसाठी एका हाताने फलंदाजी केली. त्यामुळं मला हनुमा विहारीचं म्हणणं खरं वाटतं.'

हनुमा विहारी अन् आंध्र प्रदेश संघातील खेळाडूचा वाद

  • हनुमा विहारी आणि आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन यांच्यातील वाद चव्हाट्यावर

  • 5 जानेवारी - बंगालविरूद्धच्या सामन्यावेळी हनुमा विहारी संघातील 17 वा खेळाडू केएल पृथ्वीराज याला ओरला होता.

  • त्यानंतर आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने पृथ्वी राजच्या तक्रारीनंतर हनुमाला कर्णधार पदाचा राजीनामा द्यायला सांगण्यात आला.

  • 26 फेब्रुवारी - विहारीने वक्तव्य प्रसिद्ध करत इथून पुढे आंध्र प्रदेशकडून कधीही खेळणार नसल्याचं जाहीर केलं.

  • 26 फेब्रुवारी - यावर पृथ्वी राजने विहारीवर पलटवार करत त्याला सो कॉल्ड चॅम्पियन म्हणत त्याची चेष्टा देखील केली.

  • 26 फेब्रुवारी - आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने वक्तव्य प्रसिद्ध करत संघ सहकारी, सपोर्ट स्टाफच्या तक्रारीवरून विहारीने अपशब्द वापरल्याच्या तक्रारीची पूर्ण चौकशी करण्यात येणार आहे असं सांगितलं.

  • 26 फेब्रुवारी - विहारीने यावर प्रयत्न करत रहा अशी प्रतिक्रिया दिली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT