Abhishek Sharma  esakal
Cricket

Abhishek Sharma SRH : सनराइजर्स हैदराबादच्या स्टार खेळाडूला पोलिसांनी पाठवली नोटीस; काय आहे प्रकरण?

Abhishek Sharma Surat Police Notice : मॉडेल तानिया सिंगने वेसू येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले होते.

अनिरुद्ध संकपाळ

SRH star Abhishek Sharma Surat Police Notice : सुरत पोलिसांनी सनराईजर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माला नोटीस पाठवली आहे. मॉडेल तानिया सिंगने वेसू येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले होते. त्यानंतर वेसू पोलिसांनी अभिषेक शर्माला नोटिस पाठवली आहे. 28 वर्षाची तानिया ही मुळची राजस्थानची होती. ती सध्या वेसू येथे हॅप्पी एलिगन्समध्ये वास्तव्याला होती.

वेसू पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक बीयू बारड यांनी सांगितले की, कॉल रेकॉर्डवरून तरी गेल्या काही काळापासून अभिषेक शर्मा आणि तानिया सिंह यांच्यात कोणताही संपर्क झाल्याचे आढळून आलेले नाही. मात्र अभेषिक शर्मा आणि तानियाची मैत्री पाहता अभिषेक शर्माला या प्रकरणात काही प्रश्न विचाण्यासाठी बोलवण्यात आलं आहे.

तानिया सिंह ही मुळची राजस्थानची असून ती सध्या वेसू येथे वास्तव्यास होती. तिने राहत्या अपार्टमेंटमध्येच गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवल्याने संपूर्ण शहर हादरलं होत. दरम्यान, या प्रकरणी आयपीएल स्टार अभिषेक शर्मा चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.

सुरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक शर्माचा आणि तानियाचा सध्या जरी संपर्क झाला नसला तरी तिचे आणि अभिषेकची मैत्री पाहता त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. पोलिसांनी आधीच एक वक्तव्य प्रसिद्ध करत तानियाशी संपर्कात पाच व्यक्ती संपर्क साधला होता असं सांगितलं आहे, यात मित्र आणि कुटुंबियांचा समावेश आहे.

तानियाने आपले आयुष्य असं अचानक संपवण्यामागं प्रेम संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी तानियाचे फोन रेकॉर्ड्स तपासण्यास सुरूवात केली आहे.

बारड यांनी सांगितल्याप्रमाणे कॉल रेकॉर्ड नुसार क्रिकेटर अभिषेक आणि तानियामध्ये गेल्या काही काळापासून कोणताही संपर्क नव्हता. मात्र तानियाची आणि अभिषेकची मैत्री पाहता त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

कोण आहे अभिषेक शर्मा?

अभिषेक शर्मा हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने आयपीएलमध्ये सनराइजर्स हैदराबादकडून आतापर्यंत 47 सामन्यात 137.38 च्या स्ट्राईक रेटने 893 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 9 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

अभिषेक शर्मा हा पंजाबकडून रणजी ट्रॉफी खेळतो. त्याने 2023 - 24 च्या हंगामात चार सामने खेळले आहेत. त्यात त्याने 199 धावा केल्या असून तीन विकेट्स देखील घेतल्या आहेत.

सनराइजर्स हैदराबादने अभिषेक शर्माला गेल्या लिलावात रिटेन केलं होतं. तो आयपीएल 2024 ची तयारी करत आहे. मात्र आता त्याला पोलिसांच्या चौकशीला देखील सामोरे जावे लागणार आहे.

आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरूवात 22 मार्चपासून होत आहे. हैदराबाद गेल्या तीन हंगामापासून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल आहे. मात्र यंदाच्या हंगामात वर्ल्डकप विजेत्या संघातील पॅट कमिन्स, ट्रॅविस हेड या खेळाडूंचा संघात समावेश आहे. त्याचबरोबर वानिंदू हसरंगा देखील ताफ्यात आला असल्याने त्यांना या हंगामाकडून चांगल्या अपेक्षा असतील.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT