ACC Announces Women's Asia Cup 2024 Schedule  sakal
Cricket

IND Vs PAK: टी-20 वर्ल्ड कपनंतरही होणार भारत-पाकिस्तानचा महामुकाबला, आशिया कपच्या शेड्युलची घोषणा

ACC Announces Women's Asia Cup 2024 Schedule : आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) मंगळवारी महिला आशिया कप 2024 चे वेळापत्रक जाहीर केले.

Kiran Mahanavar

ACC Announces Women's Asia Cup 2024 Schedule : आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) मंगळवारी महिला आशिया कप 2024 चे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा 19 जुलैपासून सुरू होणार असून 28 जुलैपर्यंत श्रीलंकेतील डंबुला येथे खेळली जाणार आहे. स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत. या संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यांच्याशिवाय यूएई आणि नेपाळला या गटात ठेवण्यात आले आहे. बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान महिला संघाचा सामना नेपाळशी होणार आहे. दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना यूएईशी होणार आहे.

दोन्ही गट खालीलप्रमाणे

  • अ गट: भारत, पाकिस्तान, यूएई, नेपाळ

  • ब गट: बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, थायलंड

जय शहा यांनी व्यक्त केला आनंद

ACC अध्यक्ष जय शाह म्हणाले की, “महिला आशिया कप 2024 या प्रदेशात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ACC ची वचनबद्धता अधोरेखित करते. महिला क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि महत्त्व प्रतिबिंबित करणाऱ्या संघांमधील वाढता सहभाग आणि स्पर्धा पाहून आम्ही उत्साहित आहोत.

पुढे ते म्हणाले की, 2018 मधील सहा संघांपासून 2022 मध्ये 7 संघ आणि आता 8 संघांपर्यंतचा हा विस्तार झाला आहे, आणि हा महिला खेळ आणि आशियाई क्रिकेटमधील वाढत्या टॅलेंट पूलसाठी आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. आम्ही एका रोमांचक स्पर्धेची वाट पाहत आहोत जी खेळाडू आणि चाहते दोघांनाही प्रेरणा देईल.

स्पर्धेचे वेळापत्रक

  • 19 जुलै: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ

  • 19 जुलै : भारत विरुद्ध UAE

  • 20 जुलै: मलेशिया विरुद्ध थायलंड

  • 20 जुलै: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

  • 21 जुलै: नेपाळ विरुद्ध UAE

  • 21 जुलै : भारत विरुद्ध पाकिस्तान

  • 22 जुलै: श्रीलंका विरुद्ध मलेशिया

  • 22 जुलै: बांगलादेश विरुद्ध थायलंड

  • 23 जुलै : पाकिस्तान विरुद्ध UAE

  • 23 जुलै: भारत विरुद्ध नेपाळ

  • 24 जुलै: बांगलादेश विरुद्ध मलेशिया

  • 24 जुलै: श्रीलंका विरुद्ध थायलंड

  • 26 जुलै: पहिली उपांत्य फेरी

  • 26 जुलै: दुसरी उपांत्य फेरी

  • 28 जुलै: अंतिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मालवणी पॅटर्न वादावर असलम शेख यांचे अमित साटम यांना खडेबोल

Pimpri Chinchwad News : अवजड वाहने, खड्डे ठरतायत ‘काळ’; हिंजवडी–ताथवडे पट्ट्यात महिनाभरात दोघींचा मृत्यू!

Sweetlime Rate Decrease : मोसंबी नऊशे रुपये, तर कापुस सात हजार रुपये प्रति क्विंटल

Gadchiroli Premier League: गडचिरोलीत पुन्हा रंगणार क्रिकेटचा उत्सव; महिला क्रिकेट संघाचाही होणार समावेश!

SCROLL FOR NEXT