Afghanistan Cricket Team In India  esakal
Cricket

IND vs AFG : तब्बल 4 वर्षानंतर अफगाणिस्तान संघाचं होणार भारत 'होम' ग्राऊंड, 'या' मैदानावर होणार सामने

Afghanistan Cricket Team : तब्बल 4 वर्षानंतर अफगाणिस्तान त्यांची मालिका भारतात खेळणार आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Afghanistan Cricket Team In India : टी 20 वर्ल्डकपमधील सुपर 8 सामन्यात भारताने अफगाणिस्तानला मात दिली. भारताने सामना 47 धावांनी जिंकून आपला सुपर 8 मधील पहिला विजय साजरा केला. अफगाणिस्तान पहिल्यांदाच टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 8 फेरीत पोहचला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानसाठी अजून एक आनंदाची बातमी आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध अजून मजबूत करण्यासाठी बीसीसीआयने अफगाणिस्तान संघाला त्यांच्या आगामी होम सिरीज या भारतात खेळण्याची परवानगी दिली आहे.

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील मालिका ही भारतात होणार आहे. जवळपास 4 वर्षानंतर अफगाणिस्तानचा संघ भारतात पुन्हा एकदा त्यांचे घरच्या मैदानावरचे सामने खेळणार आहे. अफगाणिस्तान हे ग्रेटर नोयडाच्या मधील शहीद विजय सिंह पाठिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आपले सामने खेळत होता. आता चार वर्षानंतर ते पुन्हा तिथे आपले सामने खेळणार आहेत.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. या मालिकेत तीन वनडे सामन्यांची मालिका आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहेत. ग्रेटर नोयडा येथील स्टेडियमवर पहिल्यांदाच अफगाणिस्तानची मालिका होणार नाहीये.

यापूर्वी 2015 मध्ये अफगाणिस्तानला या मैदानावर आपले सामने खेळण्याची परवानगी देण्यात आली होती.

बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका ही 22 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यांना तेथे सराव करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ते आपला पहिला वनडे सामना हा 25 जुलैला खेळणार आहेत.

त्यानंतर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दसरा वनडे सामना हा 27 आणि तिसरा वनडे सामना हा 30 जुलै रोजी होणार आहे. टी 20 मालिका ही 2 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT