ICC Champions Trophy 2025 esakal
Cricket

PCB Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पुन्हा जर तरची भाषा! अजून कशात काही नाही तरी द्विपक्षीय मालिकेबद्दल ताठर भुमिका

अनिरुद्ध संकपाळ

PCB Champions Trophy 2025 : भारतीय संघ पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानाच जाणार नाही अशी बातमी समोर आल्यानंतर पीसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पीसीबी याबाबत बीसीसीआयने अधिकृत घोषणा केल्यानंतर यावर आपलं मत व्यक्त करणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, पीसीबी अधिकाऱ्याने आयएएनएसशी बोलताना सांगितले की, 'पीसीबी चेअमन मोहसीन नक्वी यांनी आधीच सांगितलं आहे की पाकिस्तान भारतासोबत द्विपक्षीय मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळण्यास तयार आहे. फक्त भारताने पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हायला हवं.'

पीसीबी अधिकारी पुढे म्हणाला की, 'रोहित शर्माचं वक्तव्य आणि बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळणाऱ्या माहिती यामध्ये मोठा विरोधाभास आहे. यावरून स्पष्ट होतं की क्रिकेटचा विषय येतो त्यावेळी खेळाडूंची इच्छा असते त्यांना काही अडचण नाहीये. मात्र भारताचे राजकीय नेतृत्व कायम यामध्ये मोडता पाय घालतं.'

हा संपूर्ण विषय ज्यावेळी पीसीबी फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी नाही तर भारतासोबत द्विपक्षीय मालिका देखील आयोजित करू इच्छित आहे असं वृत्त आल्यानंतर सुरू झाला. यावर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'द्विपक्षीय मालिका विसरा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी देखील पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाहीये.'

नुकतेच रोहित शर्माने पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्याबाबत वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, 'मी पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांच्याविरूद्ध खेळत आहोत. दोन्ही संघात चांगली स्पर्धा होते. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची चिंता नाही. मला फक्त बॅट आणि बॉलमध्ये चांगली स्पर्धा झालेली हवी आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT