Suryakumar Yadav - Ajinkya Naik Sakal
Cricket

MCA President: अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेटचे नवे अध्यक्ष, आशिष शेलारांच्या उमेदवाराचा दारुण पराभव

MCA president election: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक यांनी जिंकली आहे. त्यांनी या निवडणूकीत आशिष शेलारांच्या उमेदवाराचा पराभव केला.

Pranali Kodre

Ajinkya Naik is new MCA president: अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेदरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले होते. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद रिकामे होते.

यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणूकीत अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली असून त्यांनी आशिष शेलार यांचा पाठिंबा असलेले उमेदवार संजय नाईक यांचा तब्बल १०७ मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

त्यामुळे आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद अजिंक्य नाईक सांभाळतील. अजिंक्य नाईक एमसीएचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये 329 क्लब मतदार आणि 47 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हे मतदार असून अध्यक्षपदासाठी झालेल्या निवणूकीत जवळपास ८०% हुन जास्त मतदान पार पडले होते.

अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत अजिंक्य नाईक यांना २२१ मतं मिळाली असून संजय नाईक यांना ११४ मतं मिळाली.

या विजयानंतर अजिंक्य नाईक म्हणाले, 'मला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार. माझा विजय हा अमोल काळे यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा पुरावा आहे. माझे प्रयत्न आणि मेहनत मुंबई क्रिकेटची गुणवत्ता सुधारण्यासाठी असतील आणि अमोल काळे यांचा क्रिकेटचा वारसा पुढे नेण्याचे राहतील.'

अमोल काळे यांचे 10 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये निधन झाले होते. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यानंतर या निवडणूकीत एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक उपाध्यक्ष संजय नाईक रिंगणात होते. यामध्ये अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करत निवडणूक जिंकली.

अजिंक्य नाईक 2015 पासून एमसीएमध्ये काम करत आहेत. ते यापूर्वी एमसीएच्या मार्केटिंग कमिटीमध्ये होते. त्यानंतर ते अपेक्स कौन्सिल सदस्य झाले. यानंतर ते गेल्या काही वर्षांपासून सचिवपद सांभाळत होते. आता ते अध्यक्षपद सांभाळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Reaction on Jarange Hunger Strike: मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले..

सरोगसी करण्यासाठी किती खर्च येतो? सनी लिओनी म्हणाली- आम्ही त्या मुलीला इतके पैसे दिलेले की तिने...

Cyber Crime: गणेशोत्सवात सायबर भामट्यांचे जाळे! घरपोच प्रसाद, व्हीआयपी दर्शनाचे प्रलोभन

Latest Maharashtra News Updates : बोरिवली पश्चिमेतील दत्तानी टॉवरमधील फ्लॅटला लागली भीषण आग

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंना एकच दिवस परवानगी मिळालीय, सरकार काय करणार? एकनाथ शिंदे म्हणाले, ''आम्ही....''

SCROLL FOR NEXT